Take a fresh look at your lifestyle.

तापसीचा नवा लूक, घरातच कटींग केले केस

मुंबई | बाॅलिवुड अभिनेत्री तापसी पन्नू नेहमीच आपल्या हटके अंदाजाने चर्चेत असते. आता तापसीने लाॅकडाउनच्या काळात एक अनोखा प्रयोग करुन पाहिला आहे. तापसीने आपले केस घरातच कटिंग केले आहे.

लांब केस असणार्‍यांना त्यांचे केस अजिबात कापू वाटत नाहीत. मात्र मला मला माझ्या पंजाबी जीन्सवर विश्वास आहे. घरची शेती असल्याने माझे केस लवकरच लांब होतील यावर माझा विश्वास आजे असं म्हणत आपला केस कट केल्यानंतरचा हटके लूक तापसीने इंन्स्टाग्रामवर शेयर केले आहे.

दरम्यान, तापसी नेहमीच आपल्या केसांसोबत नवनवीन प्रयोग करत असते. तापसी १२ वर्षांची असताना तीने आपले केस स्ट्रेटनिंग केले होते. मागे तिने आपले केस कुरळे करुन घेतले होते. काही दिवसांपूर्वीच तापसीने आपले केस जांभळ्या रंगाने रंगवले होते. आता तापसीने केस कट करुन असा हटके लूक केला आहे.