Take a fresh look at your lifestyle.

तापसी पन्नूचा रहस्यात्मक ‘हसीन दिलरुबा’; फर्स्ट लूक रिलीज !

0

हॅलो बॉलीवूड, ऑनलाईन ताप्सीच्या आगामी ‘हसीन दिलरुबा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर आज प्रसिद्ध झाले आहे. या पोस्टरमध्ये तापसीचा चेहरा दिसत नाही, परंतु असे असूनही हे पोस्टर शक्तिशाली आहे. थोड्या वेळासाठी पोस्टर पहात रहाल. ते पाहिल्यानंतर बरेच प्रश्नही सर्वांच्या मनात येतील.

पोस्टरमध्ये एका मुलीचे केवळ पाय दिसत आहेत, तिचा (म्हणजे ती तापसीच असावी, पण थ्रिलर वाल्यांचा काही भरोसा नसतो हो) चेहरा दिसत नाही. पण पोस्टर प्रभावी बनलं आहे. पोस्टर पोस्ट करत, तापसीने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे. पुढील वर्षी 18 सप्टेंबर 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटात तापसी व्यतिरिक्त विक्रांत मस्सी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

२०१९ मध्ये ‘सांड की आँख’, ‘मिशन मंगल’ आणि ‘बदला’ असे तीन हिट चित्रपट दिल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही सन २०२० मध्येही त्याच गतीने शुटिंग करणार आहे. पुढच्या वर्षी तापसी तीन चित्रपटात दिसणार आहे. अनुभव सिन्हाचा ‘थप्पड़’, भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिताली राजची बायोपिक ‘शाबाश मिठू’ आणि ‘हसीन दिलरुबा’.

Leave a Reply

%d bloggers like this: