Take a fresh look at your lifestyle.

तब्बल 20 वर्षांनी तारा- सकीना पुन्हा परतणार; लवकरच ‘गदर- 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गदर एक प्रेमकथा हे केवळ नावच लोकांसाठी बस्स आहे. कारण २० वर्षांपूर्वी २००१ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे कथानक आणि कलाकारांचा अभिनय तसेच गाणी अतिशय लोकप्रिय झाली होती. या चित्रपटातील मुख्य नायक तारासिंग अर्थात सनी देओल आणि मुख्य नायिका सकीना अर्थात अभिनेत्री आमिशा पटेल यांच्या भूमिकांचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच झळकला होता. यानंतर अखेर आता २० वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वल गदर २ याचे शूटिंग झाले आहे. हिंदुस्थान – पाकिस्तान हीच या चित्रपटाची पार्श्वभूमी असल्याचे समजते आहे. सध्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

‘ हमारा हिंदुस्थान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा’ यासारखे जोशपूर्ण डायलॉग गदर या चित्रपटात होते. आजही हे डायलोग लोक विसरलेले नाहीत. याशिवाय ‘मैं निकला ओ गड्डी लेके’ तसेच ‘ओ घर आजा परदेसी’ हि गाणी आजही सदाबहार आहेत.

सनी देओल आणि अमिशा पटेलच्या ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटाने २००१ साली बॉक्स ऑफिसवर १३३ कोटींची कामे करून मोठे यश मिळवले होते. यानंतर आता या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शूटिंग दरम्यानचे तारा आणि सकीनाचे फोटो व्हायरल झाले आहेत आणि ते पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

गदर २ मध्ये सुद्धा सनी देओल आणि अमिशा पटेल ही सुपरहिट जोडी दिसणार आहे. तसेच उत्कर्ष शर्मा हा त्यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसेल. सोशल मीडियावर ‘गदर २’ च्या शूटिंगचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये तारा अर्थात सनी देओल पगडी बांधून बसलेला दिसत आहे. तर अमिशा सलवारमध्ये दिसतेय. हे फोटो बघून अनेकांनी ‘गदर’ च्या आठवणी जाग्या झाल्या असे म्हटले आहे. अभिनेत्री अमिशा पटेलनेसुद्धा सोशल मीडियावर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.