Take a fresh look at your lifestyle.

‘भारत माझा देश आहे’; कोल्हापुरातील सैनिक ठाकळीत चित्रपटाचा टिझर रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘भारत माझा देश आहे हा पॅट्रिऑटिक म्हणजेच देशभक्तीपर चित्रपट येत्या ६ मे २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले होते. यानंतर आता चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. कोल्हापूरातील सैनिक ठाकळी गावात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. यानंतर आता त्याच गावात ‘भारत माझा देश आहे’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यावेळी अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

या लॉन्चिंग सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कोल्हापूरच्या ए. सी. एच. एस. ऑफिसर इन्चार्ज कर्नल विलास सुळकुडे, माजी ७ सैनिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष ऑ. लेफ्ट. बी. एस. पाटील, लोकनियुक्त सरपंच हर्षदा विनोद पाटील, गाव कामगार पोलिस पाटील सुनिता राजेंद्र पाटील यांचीदेखील प्रमुख उपस्थिती होती. या व्यतिरिक्त या सोहळ्याला चित्रपटातील कलाकार, महाराष्ट्रातील पत्रकार आणि सैनिक टाकळी गावातील ग्रामस्थदेखील सहभागी झाले होते. देशसेवेत आपले अमूल्य योगदान देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांचा यावेळी सत्कार करण्यात आला आणि दरम्यान यावेळी सुट्टीवर आलेल्या सैनिकांकडून सीमेवरील अनुभवही ऐकता आले.

नुकताच प्रदर्शित झालेला हा टिझर अतिशय लक्षवेधी आहे. यात देशाच्या सीमेवर सुरू झालेली लढाई ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून सर्वांच्या घराघरात पाहायला मिळत आहे. ही बातमी पाहून सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या घरच्यांची होत असलेली तळमळ टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात राजविरसिंह राजे गायकवाड आणि देवांशी सावंत या बाल कलाकारांसह मंगेश देसाई, शशांक शेंडे, हेमांगी कती छाया कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी पिकल एंटरटेनमेंटने सांभाळली आहे.

आपल्या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक पांडूरंग जाधव म्हणाले कि, ” हा देशभक्तीवर आधारित चित्रपट असला तरी याच्या माध्यमातून आपल्याला सैनिक सीमेवर तैनात असताना त्यांच्या कुटुंबियांच्या मनातील भीती घालमेल दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. या चित्रपटाची कथा मनाला स्पर्श करणारी आहे. देशसेवेवर आधारित हा चित्रपट सामाजिक संदेशही देतोय. जो सर्वांना विचार करायला लावेल. चित्रपटाचा टीझर येथे प्रदर्शित करण्याचा मुख्य हेतू म्हणजे हे एक असे गाव आहे. जिथे प्रत्येक घरातील व्यक्ती देशसेवेत रुजू आहे. त्यामुळे हा चित्रपट आम्ही या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना समर्पित करत आहोत. अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता होती अखेर आता टीझर प्रदर्शित झाला असून लवकरच चित्रपटही प्रदर्शित होईल. आज टिझरच्या निमित्ताने मी आवाहन करतोय की प्रत्येक पालयाने आपल्या पालकांसोबत हा चित्रपट नक्की पाहावा मनोरंजनाबरोबरच सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे”