Take a fresh look at your lifestyle.

सगळेच राजकारणी सारखे नसतात..काही ‘आनंद दिघे’ असतात ; ‘धर्मवीर’ चित्रपटाचा टिझर रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ख्याती असलेले प्रवीण तरडे यांचा ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. येत्या १२ मे २०२२ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित झाला आहे. आनंद दिघे हे नाव आजच्या तरुणाईलाही ठाऊक असण्याचं एकमेव कारण म्हणजे, या व्यक्तीने आपले आयुष्य सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची केले. धमर्वीर आनंद दिघे यांची ठाण्याचा वाघ म्हणून ख्याती आहे. यामुळे लोकनेते त्यांच्या जीवनपटावर चित्रपट काढण्याचे तरडेंनी योजिले. या चित्रपटात दिघेंच्या भूमिकेत अभिनेता – दिग्दर्शक प्रसाद ओक दिसतोय. तर हा दमदार टिझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

‘धर्मवीर- मुक्काम ठाणे’ या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. आघाडीचा अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक हा आनंद दिघेंच्या भूमिकेत असल्याचे टीझरमध्ये पहायला मिळत आहे. जवळपास दीड मिनिटांच्या या टीझरमध्ये हटके डायलॉग, हुबेहूब व्यक्तिरेखा आणि प्रवीण तरडेंचा बॅक व्हॉईस ओव्हर अगदी मनोरंजनाची पर्वणी असल्याचे जाणवते आहे.

हा टिझर इंस्टावर पोस्ट करताना प्रसाद ओकने लिहिले कि, जय महाराष्ट्र.. मनःपूर्वक आभार. मंगेश देसाई, प्रवीण तरडे आणि मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब हि “सुवर्णसंधी” मला दिल्याबद्दल! आणि “दिघे साहेब”..सांभाळून घ्या..तुमचा आशीर्वाद कायम असू द्या पाठीशी. सगळेच राजकारणी सारखे नसतात. काही ‘आनंद दिघे‘ असतात. एका धगधगत्या अग्निकुंडाची चरित्रगाथा मोठ्या पडद्यावर धर्मवीर , मुक्काम पोष्ट ठाणे १३ मे २०२२

आपल्या भूमिकेविषयी सन्मान बाळगत अभिनेता प्रसाद ओक व्यक्त झाला. दरम्यान तो म्हणाला कि, “तळागाळातील लोकांचा विचार करणं हे आनंद दिघेंचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. गरीबांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे आणि जुलूमाची भाषा करणाऱ्यांवर जरब बसवणारं हे व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी त्यांच्या कामाच्या माध तून माणसं जोडली. या चित्रपटाच्या निमित्ताने मला त्यांचा हा जीवनप्रवास जगता आला. त्यांच्या भूमिकेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडिया गाजवतोय. तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर किती गाजेल हे पाहणे औत्सुक्याचे आहे.