Take a fresh look at your lifestyle.

प्रेमात पडलं कि रंग बदलतात.. ‘आठवा रंग प्रेमाचा’; रिंकू राजगुरूच्या आगामी चित्रपटाचा टीझर लाँच

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| चित्रपटसृष्टीमध्ये फार कमी वेळात मोठे यश संपादन करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू हि एक अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाने अभिनेत्री रिंकु राजगुरुने प्रेक्षकांच्या मनात आपले असे एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. सैराटनंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. यानंतर आता परत एकदा ती लवकरच नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिचा आगामी चित्रपट “आठवा रंग प्रेमाचा” याचा टीजर नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून लाँच करण्यात आला आहे. अत्यंत फ्रेश आणि रोमॅन्टिक कथा असलेल्या या चित्रपटाचा टिझर सुद्धा लक्षवेधी आहे.

 

अ टॉप अँगल प्रॉडक्शनच्या समीर कर्णिक यांनी “आठवा रंग प्रेमाचा” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर आदिनाथ पिक्चर्सच्या आशिष भालेराव, राकेश राऊत प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तसेच दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे आहे आणि त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. समीर कर्णिक यांनी “क्युं हो गया ना..” हा पहिला चित्रपट बॉलिवूडमध्ये केला. त्यानंतर यमला पगला दिवाना, चार दिन की चांदनी, हिरोज अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन समीर कर्णिक यांनी यांनी केलं. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे, रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद हे कलाकार दिसणारआहेत . यातील विशाल आनंद हा नवोदित कलाकार आहे.

 

रिंकू राजगुरूने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर आपल्या आगामी चित्रपटाचा टिझर शेअर केला आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरूने या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. याला तिने “सगळ्यांचे रंग बदलतात. जेव्हा माणसं प्रेमात पडतात. आठवा रंग प्रेमाचा १७ जूनपासून सर्वत्र प्रदर्शित”, असं कॅप्शन दिलं आहे. आता प्रेक्षकांना प्रश्न पडलाय कि हा आठवा रंग आहे तरी कुणाचा..? आणि कुणाच्या प्रेमाचा..? याची उत्तर १७ जूनपासून मिळतील. सिनेमागृहात लाडक्या रिंकूचा चित्रपट पाहायला विसरू नका.. आठवा रंग प्रेमाचा..