Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेता सनी देओलचं जोरदार कमबॅक; ‘चूप’ चित्रपटाचा टीझर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 9, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Chup
0
SHARES
9
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता सनी देओल गेल्या बऱ्याच काळापासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. पण आता त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. ‘चूप- द रिवेंज ऑफ द आर्टिस्ट’ हा सायकॉलॉजीकल थ्रिलर चित्रपट घेऊन तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते गुरू दत्त यांच्या बर्थ अॅनिवर्सरीचे औचित्य साधून या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा टीझर बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी शेअर केलाय. हा चित्रपट गुरू दत्त यांना श्रद्धांजली असल्याचे सांगितले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनेता सनी देओल हा फायटर अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या चित्रपटातील ऍक्शन हीच खरी चित्रपटाची ओळख. बऱ्याच वर्षांनी परत एकदा सनी मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठा आनंद आहे. कारण तो कमबॅक करतोय म्हणजे ऍक्शन धमाका तर होणारच. तूर्तास ‘चूप’ या चित्रपटाचा टीझर सोशल मिडीआयवर धुमाकूळ घालतोय. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांनी हा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावर प्रेक्षकांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

या चित्रपटाची कथा काहीशी अनोखी असणार आहे. कारण चित्रपटाच्या टीझरमध्ये सुरुवातच दुलकर सलमानच्या एन्ट्रीने होतेय. यात तो कागदाची फुले बनवताना दिसतोय. कागज के फूल चित्रपटाच्या ट्यूनवर यावेळी तो हॅप्पी बर्थडे गाताना दिसत आहे. यानंतर तो बनवलेली कागदाची फुले एका मुलीला देतो आणि त्यावेळी फुलं बघताच ती म्हणते कागज के फूल..? यानंतर सनी देओलची एन्ट्री होते.

View this post on Instagram

A post shared by $@M (@samthebestest_)

याचे कथानक हे थ्रिलर ड्रामा असेल असे टीझरवरून वाटते. याचे दिग्दर्शन दिग्दर्शक आर बाल्की यांनी केले आहे. शिवाय गुरू दत्त यांचा आज वाढदिवस म्हणून याचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. गुरुदत्त यांचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन झाले होते.

Tags: Bollywood Upcoming MovieOfficial Teasersunny deolViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group