Take a fresh look at your lifestyle.

आता झोप उडणार ! सावध रहा..!; ‘वाय’चा थरारक टीझर घेऊन आलाय ‘ती’ची गोष्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्या ‘वाय’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. मुख्य म्हणजे ‘वाय’ या चित्रपटाचा थरारक टीझर रिलीज झालाय आणि या चर्चांचे कुतूहलाचा परिवर्तन झाले आहे. अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित आणि मुक्त बर्वे अभिनित ‘वाय’ हा अनोख्या कथानकाचा चित्रपट २४ जून २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

या आधी चित्रपटाचे केवळ पोस्टर चर्चेत होते. पण आता टिझर रिलीज नंतर या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कंट्रोल एन प्रॉडक्शन्स निर्मित चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांचे आहे. तर पटकथा आणि संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांचे आहेत. तसेच कार्यकारी निर्माते विराज विनय मुनोत आहेत.

अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने आपल्या सोशल मीडियावर आगामी चित्रपट ‘वाय’ चा टिझर शेअर केला आहे. अतिशय थरारक या टीझरमध्ये मुक्त झोपलेली दिसतेय. दरम्यान ती झोपलेतुन अचानक जागी होते आणि तिच्या दिशेने एक अक्राळविक्राळ, भयावह कुत्रा गुरगुरत झेपावताना दिसतो. हा कुत्रा मुक्तावर का गुरगुरतोय..? तो मुक्तावर का हल्ला करतोय..? नक्की काय घडतंय आणि कशासाठी घडतंय? असे अनेक प्रश्न हा टिझर निर्माण करतोय. अर्थात या सर्व प्रश्नांची उत्तरे आता चित्रपट पाहिल्यावरच मिळतील.

दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर हे आपल्या चित्रपटाच्या टीझरविषयी बोलताना म्हणाले कि, ”वाय’ या शिर्षकामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. ‘वाय’ ही आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे. या टीझरचा आणि ‘वाय’ या नावाचा अर्थ तुम्हां सर्वांना जाणून घ्यायचा आहेच आणि त्यासाठी ‘वाय’ नक्की म्हणजे नक्की पहा.” याआधी ‘वाय’चे पोस्टर सोशल मीडियावर चांगलेच गाजले होते. या पोस्टरमध्ये मुक्त बर्वे अतिशय आक्रमक अंदाजात दिसून आली होती. भेदरलेला चेहरा पण तितकीच आक्रमकता आणि तिच्या हातात असणारी मशाल हे पोस्टर आणखीच लक्षवेधी बनवीत होते.