Take a fresh look at your lifestyle.

आई बाबा आणि साई बाबा शप्पथ.. दगडू Is बॅक रे बाबा; ‘टाईमपास 3’चा टीजर रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आई बाबा आणि साई बाबा शपथ… नया है वह.. माझ्या बाबांना शाकाल बोललास.. असले भन्नाट डायलॉग्स, कमालीचं कॉमिक टायमिंग, थोडा लव्ह, थोडा इमोशन सगळं काही एकात मिळेल असा चित्रपट म्हणजे टाईमपास. या चित्रपटाचा चाहता वर्ग असा काही आहे कि आजही हा चित्रपट लागला तर चॅनेल बदलत नाही. आतापर्यंत टाईमपास आणि टाईमपास २ ने कहर केल्यानंतर आता लवकरच टाईमपास ३ येतोय. आता होणार फक्त कल्ला, प्रेमाचा हल्लागुल्ला कारण दगडू इज बॅक रे बाबा! याविषयीची खास पोस्ट आणि खास झलक असलेला टाईमपास ३ चा टिझर रिलीज झाला आहे. प्रथमेश परबने हा टिझर सोशल मीडियावर शेअर केलाय.

हा टिझर शेअर करताना प्रथमेशने लिहिलंय कि, आई बाबा आणि साईबाबा शप्पथ…आणतोय तीच मजा, तोच टाईमपास एका वेगळ्या अंदाजात… पाहा दगडू आणि पालवीच्या गोष्टीची झलक, ‘टाईमपास ३’ २९ जुलै २०२२ पासून सिनेमागृहात. आता टाईमपास ३ मध्ये सगळं काही हटके असणार हे काही वेगळं सांगायला नको. पण वेगळं म्हणजे या गोष्टीत पराजु अर्थात प्राजु नाहीये. तर या गोष्टीमध्ये पालवी आहे आणि सोबत शाकाल पण आहे बरं का. त्यामुळे नवीन गोष्ट.. नवे ट्विस्ट आणि फुल्ल धमाल करायला तयार व्हा. कारण येत्या २९ जुलै २०२२ रोजी हा चित्रपट सिनेमागृहात दंगा करायला सज्ज झालाय.

या टीझरमध्ये तुम्ही पाहू शकता कि, अगदी टाईमपास पासून टाईमपास २ चीही झलक या टीझरमध्ये आहे. या टीझरची खास आणि आकर्षणाची बाब म्हणजे पालवी कोण आहे माहितेय का..? तुमची लाडकी फुलपाखरू अर्थात अभिनेत्री ऋता दुर्गुळे. होय. या चित्रपटात प्रथमेश परब सोबत मराठी अभिनेत्री ऋता दुर्गुळे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यातही ती साकारत असलेले पालवी हे पात्र अतिशय हटके, टपोरी आणि क्युट आहे. तशीही ऋता क्युट आहे. पण पालवीचा क्युटनेस दमदार आहे. आपल्या मित्राला नडला त्याला आपण फोडला अशी हि पालवी मनोरंजनाचा फुल्ल तडका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार दिसणार हे लवकरच आपल्याला समजेल.