Take a fresh look at your lifestyle.

खूप झालं I LOVE YOU, आता फक्त.. I प्रेम YOU!; रोमँटिक मराठी सिनेमाचा टिझर रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अहो प्रेम म्हणजे काय..? एकमेकांत गुंतणं.. एकमेकांसाठी झुरणं.. एकमेकांना साथ देणं… का एकमेकांना जपणं..? खरंतर प्रेम म्हणजे एक अशी भावना जी न बोलता देखील व्यक्त करता येते . कारण प्रेमाला शाब्दिक आधाराची गरज नसते. गरज असते ती केवळ ओढीची. गरज असते ती मायेची आणि गरज असते फक्त आणि फक्त निस्वार्थ भावनेची. पण आजकाल आय लव्ह यू म्हटलं का प्रेम व्यक्त झालं असा एक गोड समज बाळगला जातो. यानंतर अनेकदा हेच ‘आय लव्ह यू’ कधी ‘आय हेट यू’मध्ये परिवर्तित होत तेच कळत नाही. म्हणून आता फक्त.. I प्रेम YOU चालणार. होय. व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने नव्या मराठी चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आहे आणि व्हायरलदेखील झालं आहे.

दिग्दर्शक नितीन कहार दिग्दर्शित हा चित्रपट निर्माते मधुकर गुरसळ यांच्या ‘साईश्री एंटरटेनमेंट’ यांनी निर्मित केला आहे. तर छायाचित्रण अविनाश सातोस्कर यांनी केले आहे. ‘आय प्रेम यु’ (I प्रेम You) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून व्हेलेंटाईन डे’चे औचित्य साधत निर्मात्यांनी याचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे. या चित्रपटात अभिनेता अभिजीत आमकर आणि अभिनेत्री कयादू लोहार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

‘आय प्रेम यु’ या चित्रपटाचे कथानक प्रेमात आकंठ बुडालेल्या युगुलांना आपलीशी वाटेल. कारण हि केवळ प्रेमकहाणी नसून प्रेमाची कहाणी आहे. मैत्री आणि अलगद तयार झालेल्या नात्यांची गुंतागुंत हा चित्रपट सोडविण्यासाठी सहाय्यक ठरेल.

या चित्रपटातील अभिजीत आणि कयादूची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यांच्या अभिनयाच्या आणि कथेच्या जोरावर हा चित्रपट प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करेल अशी निर्मात्यांनी खात्री दर्शवली आहे. या चित्रपटात अभिजीत सखा हे पात्र साकारणार आहे. संगीताची आवड असलेला सखा स्वतःच्या प्रेमात संगीताचे वलय निर्माण करताना दिसणार आहे. तर कयादू या चित्रपटात वीणा हे पात्र साकारत आहे. आपल्या उराशी स्वप्न बाळगून समोर आलेल्या प्रत्येक संकटावर मात करण्याची जिद्द बाळगणाऱ्या नायिकेची आपल्या प्रेमाला भरारी देण्याची धडपड यात दिसणार आहे.