Take a fresh look at your lifestyle.

‘आग्र्याशी दोस्ती लय भारी, आग्र्याशी दुष्मनी? खल्लास’; ‘बाबू’ चित्रपटाचा टिझर चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध भाषेतील विविध कथानकांचे चित्रपट पहायला प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळे लवकरच एका वेगळ्या कथानकासोबत बाबू शेठ मनोरंजनाचा तडका लावायला तयार आहेत. श्री कृपा प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘बाबू‘ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. इतकंच नव्हे तर हा चित्रपट सर्वत्र चांगलाच चर्चेत आहे आणि हा टिझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘बाबू’ हा एक ॲक्शन मुव्ही आहे. या चित्रपटात ‘बाबू’ची भूमिका अभिनेता अंकित मोहन साकारताना दिसतोय. तर अंकित व्यतिरिक्त या चित्रपटात रुचिरा जाधव, नेहा महाजन यांच्या अन्य प्रमुख भूमिका आहेत. बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटाचे कथानक आगरी – कोळी भागात घडणाऱ्या कथेवर आधारित आहे. गावात होणाऱ्या अन्यायाविरोधात आणि चुकीच्या राजकारणाविरोधात ‘बाबू’ आक्रमक पद्धतीने कशी उत्तरे देतो, हे या चित्रपटाच्या कथानकाचे विशेषत्व आहे.

अभिनेता अंकित मोहन ‘बाबू’ या मुख्य नायकाची भूमिका साकारतो आहे. याआधी ऐतिहासिक चित्रपटांमधून अंकितने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले आहे. या चित्रपटात मात्र अंकित ऐतिहासिक नव्हे तर एका वेगळ्या भूमिकेत दिसतोय. एक वेगळीच स्टाईल आणि पिळदार शरीरयष्टी पाहता त्याची या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत स्पष्ट दिसून येतेय. या चित्रपटाची कथा बाबू कृष्णा भोईर यांची असून संवाद आणि पटकथा मयूर मधुकर शिंदे यांचे आहेत.