Take a fresh look at your lifestyle.

केव्हीला ‘लूजर’म्हणणाऱ्या कंगनावर टीजे बरसली; ट्विट करीत शाळा घेतली

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पहिल्यांदाच रिअलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहे. या शोचे नाव आहे ‘लॉकअप’. हा शो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. काही कारणास्तव हा शो वादात सापडला होता. त्यामुळे तो चालू होईल का नाही..? अशी शंका बाळगली जात होती. मात्र आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आणि शो प्रसारित झाला आहे. यात करणवीर बोहरा अर्थात केव्ही, पायल रोहतगी, मुनव्वर फारूख, बबिता फोगट यांसारखे सेलिब्रेटी सहभागी आहेत. शोच्या सुरुवातीलाच कंगनाने प्रेक्षकांच्या लाडक्या केव्ही अर्थात करणवीरला लूजर म्हणत त्याची ओळख करून दिली होती. यावरून करणवीरची पत्नी टीजे सिद्धूनं कंगनाची ट्विटच्या माध्यामातून शाळा घेतली आहे.

नवाकोरा ‘लॉक अप’ या शोचा प्रोमो प्रसारित झाल्यानंतर केव्हीची पत्नी आणि अभिनेत्री टीजे सिद्धूनं तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर करत कंगनाच्या आरोपांवर नाराजी व्यक्त केली आहे. तिने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे कि, ‘जर एखादा यशस्वी टीव्ही अभिनेता कोणताही टीव्ही रिअलिटी शो जिंकू शकला नाही तर त्याला लूजर म्हणणं योग्य आहे का? आणि जर असं असेल तर ज्या रिअलिटी शो जिंकलेले यशस्वी अभिनेते झाले नाहीत तर ते देखील लूजर आहेत का?’ या ट्विटवर अनेक चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया देत कंगनाला बोल सुनावले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by MX Player (@mxplayer)

त्याच झालं असं कि, अभिनेत्री आणि लॉक अप शोची होस्ट कंगना रणौतने या शोमध्ये करणवीर बोहरा याची ओळख करून देताना त्याला म्हटलं होतं कि, ‘करणवीर तुझ्यावर जनतेने हा आरोप लावला आहे की, तू एक अनुभवी रिअलिटी शो लूजर आहेस?’ हे ऐकल्यानंतर कंगनाच्या याच वाक्यावर उत्तर देताना करणवीर म्हणाला होता कि, ‘तुम्ही एखाद्या व्यक्तीला अशाप्रकारे प्रेरित करता का? जर तुम्ही एखादा शो जिंकला नाही तर तुम्हीही लूजर आहात. मला माफ करा.’