Take a fresh look at your lifestyle.

नव्या आव्हानासाठी कीर्ती सज्ज; ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत तेजश्री प्रधान आणणार ट्विस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी वाहिनी स्टार प्रवाहवरील सर्वात ट्रेंडिंग मालिकांमधील एक अर्थात फुलाला सुगंध मातीचा. या मालिकेचे कथानक, कलाकार आणि शीर्षक प्रेक्षकांना फारच भावले आहे. त्यामुळे मालिकेचा टीआरपी चांगलाच वाढलेला आहे. एकीकडे मालिकेची लोकप्रियता खूप असताना आता यात प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. हि अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान आहे. होणार सून मी या घरची या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी तेजश्री आता पुन्हा एकदा मालिका विश्वात दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच आनंद आहे.

फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका हिंदीमधील ‘दिया और बाती हम’ या मालिकेचा रिमेक आहे. हिंदीमध्ये देखील ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील नायिका अर्थात कीर्ती पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन मोठी झालेली एक सर्वसामान्य घरातील मुलगी आहे.

मात्र लग्नानंतर संसाराचा‌ गाडा ओढताना ती तिच्या स्वप्नाचा त्याग करते. यात तिचा जोडीदार अर्थात मुख्य नायक शुभम तिचा पती तिला नव्याने तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उभारी देतो. असे या मालिकेचे कथानक आहे. या मालिकेने अनेक वळणं घेतली जी प्रेक्षकांना नेहमीच भावली. मालिकेतील सर्व पात्र खूप चांगली रेखली आहेत. अशातच आता तेजश्रीची एंट्री चार चाँद लावणार आणि टीआरपी आणखी वाढणार असे तिचे चाहते म्हणू लागले आहेत.

सध्या मालिकेत एक स्पर्धा दाखवली जात आहे. यात कीर्ती आणि एमली भाग घेतात आणि इथेच एंट्री होते तेजश्रीच्या पात्राची. प्रोमोमध्ये तेजश्री जवळजवळ कीर्तीला आव्हान देतेय असेच वाटत आहे. तेजश्रीचा लूक आणि अंदाज एकदम किलर आहे. तेजश्रीची सोशल मीडियावरील फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. ‘लेक लाडकी या घरची’, ‘होणार सून मी या घराची’, ‘अगंबाई सासूबाई’ यांसारख्या लोकप्रिय मालिका तिने अगदी सहज सोप्या अभिनयाने गाजवल्या. त्यामुळे तिच्या येण्याने ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत सकारात्मक बदल घडेल अशी आशा प्रेक्षक व्यक्त करीत आहेत.