Take a fresh look at your lifestyle.

..त्यांना दुःखी होण्याचा अधिकार आहे; BB विजयावर आक्षेप घेणाऱ्यांना तेजस्वीने दिले हटके उत्तर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस हा असा शो आहे ज्याने अनेको चाहते आहेत. त्यामुळे बिग बॉसचा प्रत्येक सीजन हा हिट असतो यात काही वादच नाही. बिग बॉस १५ हा सीजन सुरुवातीला फारसा गाजला नसला तरीही मध्यान्हापासून मात्र शोने चांगलाच TRP ओढला. शोमधून काही जण एव्हीक्ट झाले तर काहींना बिग बॉसने घराबाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर रविवारी या शो चा ग्रँड फिनाले पार पडला. सगळ्यांना वाटत होत कि एकतर शमिता शेट्टी हा शो जिंकेल नाहीतर करण कुंद्रा. पण तेजस्वी प्रकाशने यांना पिछाडून ट्रॉफी पटकावली तर प्रतीक सेहजपाल उपविजेता ठरला. मात्र तेजस्वीच्या विजयावर अनेकांनी प्रश्न चिन्ह उभे केले. तेजस्वीला बिग बॉसचं विजेतेपद देण्यावरुन अनेक टीव्ही कलाकारांनी आक्षेप घेतला आहे. यावरुन अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. यानंतर तेजस्वीने एका मुलाखतीत या टीकांवर सडेतोड उत्तर आणि अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

बिग बॉसचे विजतेपद मिळवल्यानंतर अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिने माध्यमांना मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने टीव्ही कलाकारांनी आक्षेप घेतल्याप्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, “माझे असे मत आहे की या शोच्या स्वरूपावर आणि लोकांकडून मला मिळणाऱ्या प्रेमावर मी विश्वास ठेवला पाहिजे. मला जास्त मतं मिळाली आहे, हे अगदी स्पष्ट आहे. पण ज्यांना या निकालाबाबत शंका त्यांनी या आधी झालेल्या पर्वातील निकालांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले पाहिजे.” “विशेष म्हणजे लोकांनी माझा विजय साजरा करावा अशी अपेक्षा मी का करावी? मी आणि माझे कुटुंब आनंदी असले पाहिजे. तसेच माझ्या चाहत्यांनीही आनंद साजरा करावा, कारण हे त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. पण जे माझा द्वेष करतात ते याबाबत आनंदी का होतील? माझ्या विजयामुळे माझे द्वेष करणारे नेहमीच दु:खी राहतील. त्यांना दु:खी होण्याचा अधिकार आहे. प्रत्येकजण माझ्यावर प्रेम करेल असे नाही. मी आईस्क्रीम नाही. मी माणूस आहे.”

पुढे म्हणाली, “मला वाटते की ‘नागिन ६’ ऑफर करण्यात आला, कारण मी बिग बॉसमध्ये चांगले काम करत होते. जर मी बिग बॉस जिंकला नसता तरी मला नागिनची ऑफर मिळालीच असती. माझा विजय हा माझा विजय आहे. मला ‘नागिन’ शो मिळाला, म्हणून मला जिंकवण्यात आलेले नाही, हे असे चालत नाही.” “बिग बॉस’मधील माझा विजय माझ्यापासून काहीही हिरावून घेऊ शकत नाही. मला एक गोष्ट समजत नाही की माझ्या बाबतीत जे घडले ते मागील पर्वात घडले नाही? एखादा अपवाद असावा आणि मी त्याला अपवाद आहे. ‘नागिन’ शो मिळवणारी आणि हुशार खेळाडू देखील असू शकते यावर विश्वास ठेवणे लोकांना इतके अवघड का जात आहे? लोक मला नेहमी घरातील एक प्रबळ दावेदार म्हणून पाहत होते,” असेही तेजस्वीने सांगितले.

दरम्यान गौहर खान, काम्या पंजाबी आणि अनिता हसनंदानीसह इतर काही स्टार्सनी सोशल मीडियावर तेजस्वीच्या विजयावर प्रश्न उपस्थित केले. या सर्व कलाकारांनी प्रतिक हा बिग बॉसचा योग्य विजेता असल्याचे म्हटले होते.