Take a fresh look at your lifestyle.

करण कुंद्राला मागे टाकून तेजस्वी प्रकाश ठरली बिग बॉस 15’च्या ट्रॉफीची मानकरी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस हा असा शो आहे ज्याने अनेको चाहते आहेत. त्यामुळे बिग बॉसचा प्रत्येक सीजन हा हिट असतो यात काही वादच नाही. बिग बॉस १५ हा सीजन सुरुवातीला फारसा गाजला नसला तरीही मध्यान्हापासून मात्र शोने चांगलाच TRP ओढला. शोमधून काही जण एव्हीक्ट झाले तर काहींना बिग बॉसने घराबाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर रविवारी या शो चा ग्रँड फिनाले पार पडला. सगळ्यांना वाटत होत कि एकतर श्मिट शेट्टी हा शो जिंकेल नाहीतर करण कुंद्रा. पण झालं उलटच. तेजस्वी प्रकाशने यांना पिछाडून ट्रॉफी पटकावली तर प्रतीक सेहजपाल उपविजेता ठरला.

 

बिग बॉसचा होस्ट अभिनेता सलमान खानने बिग बॉसच्या १५ व्या सिजनच्या विजेत्यांचे नाव घोषित करताच सगळ्यांचे डोळे विस्फारले होते. अपेक्षेहून काहीसा वेगळाच निकाल पाहून सगळेच थक्क झाले. या सिझनचे विजेतेपद अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने आपल्या नावे केले. दरम्यान करण कुंद्रा, प्रतीक सेहजपाल आणि तेजस्वी प्रकाश हे या सिजनचे टॉप ३ फायनलिस्ट स्पर्धक ठरले होते. या स्पर्धकांनी बिग बॉसची ट्रॉफी अर्थातच विजेतेपद जिंकण्यासाठी अतोनात मेहनत घेतली होती. मात्र जिंकणार एकच होता आणि तेजस्वीने बाजी मारली.

 

बिग बॉस १५ चा ग्रँड फिनाले शनिवार रविवार असा दोन दिवस गाजला. सर्व स्पर्धकांनी घेतलेली प्रचंड मेहनत सगळ्यांनाच दिसत होती. त्यामुळे प्रत्येकाचे चाहते देवाकडे आपल्या आवडत्या स्पर्धकाने जिंकावं म्हणून प्रार्थना करत होते. या फिनालेदरम्यान पूर्व स्पर्धक देखील हजार होते. याशिवाय सिजनचे होऊन गेलेले विजेते देखील आले होते. सगळ्यांनीच जबरदस्त परफॉर्मन्स दिला. आपल्या प्रेक्षकांचे पुन्हा एकदा भरभरून मनोरंजन केले. या सीझनला प्रेक्षकांचा इतका चांगला प्रतिसाद दिला होता कि आजही स्पर्धक भारावलेल्या स्थितीत आहेत.