Take a fresh look at your lifestyle.

तेजस्विनी पंडितची परखड इन्स्टा स्टोरी; राजकारण ही कोविडपेक्षा भयाण, घातक ‘कीड’!

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि मृतांचा न थांबणारा आकडा अगदी भीतीदायक स्वरूप दर्शवू लागला आहे. रूग्णालयांत बेड नाही, ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर औषध नाही, रूग्णवाहिका नाही, मग अश्या परिस्थितीत सर्वसामान्यांनी करायचे काय? अशी स्थिती संपूर्ण राज्यात असताना लसींवरून सुरु असलेले राजकारण साहण्याजोगे नाही. या अशा गोष्टीचा कोणत्याही संवेदनशील व्यक्तिला अर्थातच संताप येऊ शकतो. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हि यापैकी एक आहे. राज्यातील परिस्थिती पाहता व लोकांच्या जीवाची तमा न बाळगता सुरु असलेले राजकारण, यावर तिने परखड शब्दांत एक पोस्ट केली आहे. ज्यात तिने राजकारण ही कोरोनापेक्षा घातक कीड असल्याचे म्हटले आहे.
Insta Storyतेजस्विनी पंडित ही मराठी सिनेसृष्टीतील बिनधास्त व परखड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. विविध सामाजिक मुद्यांवर ती मतं व्यक्त करत असते. नुकतीच इन्स्टा स्टोरीवर तेजस्विनीने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटले आहे कि, ‘सगळ्यात मोठी ‘कीड’ जर आपल्या देशाला, आपल्याच नाही, तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे ‘राजकारण’… ही ‘कीड’ कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वषार्नुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या ‘कीड’पासून बचाव करता आला तर बघा! ..अवघड आहे सगळंच….काळजी घ्या.

तेजस्विनी पंडित या मराठी अभिनेत्रीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटाद्वारे करियरला सुरुवात केली. या चित्रपटात ती नकारात्मक भूमिकेत झळकली होती. त्यानंतर तिने गैर, तु ही रे, देवा, ये रे ये रे पैसा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिचा ‘मी सिंधुताई सकपाळ’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. तिने यासोबतच तुझं नि माझं घर श्रीमंताचं, १०० डेज यांसारख्या मालिकांमध्ये विविध धाटणीच्या उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. तर नुकतीच ती स्वप्नील जोशी सोबत ‘समांतर’ या बहुचर्चित वेबसिरीज मध्ये दिसली होती.