Take a fresh look at your lifestyle.

Dharmaveer Trailer Launch: ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’च्या ट्रेलर लॉंचसाठी ठाकरे आणि खान एकाच मंचावर; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। Dharmaveer Trailer Launch सर्वसामान्यांसाठी आयुष्य खर्ची करणाऱ्या व्यक्तिमत्वाची नव्याने आगामी पिढीला ओळख करून देणे असा ध्यास उराशी बाळगून प्रवीण तरडे यांनी धर्मवीर या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट बाळासाहेब ठाकरे यांचे शिष्य आणि ठाण्याचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेल्या धर्मवीर आनंदराव दिघे यांच्या जीवनावर आधारित आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

यामध्ये शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. इतकेच नव्हे तर बॉलिवूड इंडस्ट्रीचा भाईजान सलमान खान देखील याठिकाणी उपस्थित होता. (Dharmaveer Trailer Launch)

शनिवारी दिनांक ७ मे २०२२ रोजी वांद्रे येथील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा ट्रेलर लॉंच सोहळा दिमाखदार पद्धतीने पार पडला.  जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आनंद दिघे यांचे कर्तृत्व आभाळाएवढे आहे. या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात आणि प्रवीण तरडे यांच्या प्रयत्नांतून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यामध्ये दिघेंची भूमिका आघाडीचा अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने साकारली आहे. त्याच्या पहिल्या लुकपासूनच सोशल मीडियावर धर्मवीर चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे. येत्या १३ मे २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Dharmaveer Trailer Launch)

(Dharmaveer Trailer Launch) यावेळी अभिनेता प्रसाद ओक याने आनंद दिघे यांच्या संग्रही असलेल्या पांढऱ्या गाडीतून दमदार एंट्री घेतली. प्रसादला या गाडीतून उतरताना पाहून सर्वांचे डोळे विस्फारले होते. अनेकांना पुन्हा एकदा आनंद दिघे स्वतः समोर आहेत का काय असेच भासले आणि पुन्हा एकदा प्रसादने टाळ्यांचा कडकडाट मिळविला. यावेळी मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत उपस्थित होते. या सोहळ्यात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला चाफ्याची फुले अर्पण करण्यात आली. दरम्यान बॉलीवुड अभिनेता सलमान खान हा सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरला. शिवाय या सोहळ्याला अभिनेता रितेश देशमुख, जॅकी श्रोफ, अर्षद वारसी, कश्मिरा शाह आणि मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती.