Take a fresh look at your lifestyle.

..आणि ते विभक्त झाले; सुपरस्टार धनुष आणि थलायवा रजनीकांत यांची सोयरीक तुटली

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टाॅलिवूड सिनेइंडस्ट्रीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून एका मोठ्या बातमीचा स्फोट झाला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या हे दोघे कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. त्यामुळे थलायवा रजनीकांत आणि धनुषची सोयरीक तुटली आहे. गेल्या १८ वर्षांची साथ आणि सुखी संसार यानंतर दोघांनीही सामंजस्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती धनुष आणि ऐश्वर्या यांनी सोशल मीडियावर दिली आहे. त्यांच्या चाहत्यांसाठीदेखील हि बातमी फार मोठा धक्का ठरतेय.

आपला घटस्फोट झाला आहे हे सांगताना सुपरस्टार धनुष याने सोशल मीडिया ट्विटरचा वापर केला आहे. धनुषने ट्विट करत लिहिले आहे कि, ‘आम्ही १८ वर्षे एकत्र होतो. ज्यामध्ये आम्ही मित्र, जोडपे आणि पालक म्हणून एकत्र राहत होतो. या प्रवासात आपण खूप काही पाहिलं. यानंतर आज आमचे मार्ग वेगळे झाले आहेत. ऐश्वर्या आणि मी आता जोडपे म्हणून वेगळे होत आहोत. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आम्हाला गोपनीयता द्या. याशिवाय रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या हिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करत या वृत्तास दुजोरा दिला आहे. ऐश्वर्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, कॅप्शनची गरज नाही…फक्त तुझी समजूत आणि तुझे प्रेम!

रिपोर्टनुसार, ऐश्वर्या आणि धनुषचे लग्न झाले तेव्हा धनुष २१ तर ऐश्वर्या २३ वर्षांची होती. दोघांचे लग्न तामिळ रितीरिवाजांनुसार धुमधडाक्यात झाले होते. या दोघांना दोन मुलं आहेत. यातील एकाचे नाव यात्रा राजा आणि दुसऱ्याचे नाव लिंगा राजा असे आहे. धनुष आणि ऐश्वर्याची भेट ‘कदल कोंडाएं’ या चित्रपटादरम्यान झाली होती. दरम्यान निर्मात्यांनी ऐश्वर्याची धनुषशी ओळख करून दिली आणि त्याच्या उत्कृष्ट अभिनयाबद्दल तिने त्याचे भरभरून कौतुक केले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याने धनुषसाठी पुष्पगुच्छ पाठवला होता. ऐश्वर्याची ही गोष्ट धनुषला आवडली आणि त्यानंतर दोघेही मित्र झाले. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि १८ नोव्हेंबर २००४ रोजी दोघांनी साता जन्मासाठी गाठ बांधली. पण अखेर काही कारणांमुळे हि गाठ सुटली आणि हे दोघे आज वेगळे झाले आहेत.