Take a fresh look at your lifestyle.

थलायवा रजनी अण्णाचा राजकारणाला कायमचा निरोप; पक्ष बरखास्त करण्याचा निर्णयही जाहीर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दक्षिणात्य मेगा स्टार थलायवा रजनी अण्णा अर्थात सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी राजकारणाला पूर्णविराम दिला असल्याचे वृत्त समोर येत आहे. इतकेच नव्हे तर राजकारणात पुनरागमन करण्याची कोणतीही शक्यता नाही, असे म्हणत त्यांनी आपला पक्षदेखील विसर्जित केला आहे. गेल्या काही दिवसांपासून रजनीकांत यांच्या राजकीय हालचाली पाहता अनेक राजकीय विश्लेषकांसह त्यांच्या चाहत्यांमधूनही अनेक विविध प्रकारचे तर्क – वितर्क लावले जात होते. मात्र आता खुद्द रजनीकांत यांनीच त्यांचा हा निर्णय जाहीर केल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

रजनीकांत यांनी आपल्या रजनी मक्कल मंद्रम पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत सोमवारी (आज दिनांक १२ जुलै २०२१ रोजी) सकाळी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी रजनी मक्कल मंदरम संघटना बरखास्त करत राजकारणातील त्यांचा सुरु केलेला बड्या पल्ल्याचा प्रवास थांबवला आहे. मुख्य म्हणजे भविष्यात राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही, असे देखील रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या निर्णयानंतर त्यांच्या चाहत्या वर्गातून मात्र निश्चितच नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र रजनीकांत यांचा निर्णय स्पष्ट असल्याचे म्हणत त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान, ‘मी एक राजकीय पक्ष सुरू करण्याचा आणि राजकारणात सक्रिय होण्याच विचार केला होता. परंतु शक्य झालं नाही. भविष्यात राजकारणात येण्याचा माझा कोणताही विचार नाही. त्यामुळे रजनी मक्कल मंद्रम हा पक्ष विसर्जित होईल आणि त्याचं रासिगर नारपानी मंद्रम किंवा रजनीकांत फॅन्स वेलफेअर चॅरिटी फोरममध्ये रूपांतर करण्यात येईल. म्हणून काम करेल,’ अशी माहिती त्यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या निवेदनातून दिली आहे.

 

रजनीकांत म्हणजे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चमकता ताराच. अनेको लोक त्यांना अगदी देवासमान मानतात. इतकेच काय तर कित्येक लोक त्यांची पूजासुद्धा करतात . त्यांचा एखादा चित्रपट थिएटर लागला कि लोक मोठ्या संख्येने गर्दी करतात. असा मोठा चाहता वर्ग असणारे रजनीकांत राजकारणात उतरले काय आणि निघाले काय? हे काही चाहत्यांना पचण्याजोगे नव्हते. मात्र राजकारणापेक्षा रजनीकांत यांची लोकांच्या मनातील जागा अत्यंत खोल आहे. त्यामुळे चाहत्यांचे प्रेम त्यांच्यासाठी नेहमीच मोठी संपत्ती राहिली आहे.