Take a fresh look at your lifestyle.

‘थप्पड’मधील दमदार संवाद लिहिलेत ‘या’ मराठी अभिनेत्रीने

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । “थप्पड, बस इतनी सी बात?” ‘थप्पड’ चित्रपटातील या संवादाने सर्व प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘थप्पड’ या चित्रपटात यांसारखे अनेक दमदार संवाद आहेत. चित्रपटासोबतच त्यामधील मनाला भिडणाऱ्या अनेक संवादाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. यात अनुभव सिन्हा यांच्यासोबत एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा सिंहाचा वाटा आहे. ही अभिनेत्री आहे मराठीतील दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांची मुलगी मृण्मयी लागू. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यासोबत तिने ‘थप्पड’ची कथा लिहिली आहे.

मृण्मयी लागू यांनी अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन अशा सर्वच आघाड्यांवर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. ‘थप्पड’ची कहाणी ही समाजाला विचार करायला प्रवृत्त करणारी असून समाजातील सर्वच स्तरांतून चित्रपटाचं कौतुक होत आहे.

 

‘थप्पड’ या चित्रपटात तापसी पन्नू, रत्ना पाठक शाह, मानव कौल, दिया मिर्झा, तन्वी आज़मी आणि राम कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनुभव सिन्हा दिग्दर्शित आणि भूषण कुमार निर्मित हा चित्रपट २८ फेब्रुवारी २०२० ला प्रदर्शित होणार आहे.

 

Comments are closed.

%d bloggers like this: