Take a fresh look at your lifestyle.

म्हणुन बाॅलिवुड अभिनेता अक्षय कुमार त्या फोटोग्राफरवर भडकला

मुंबई । कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतोच आहे. आतापर्यंत देशभरातील ८ लाखाहून अधिक लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. या विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञ व डॉक्टर्स घराबाहेर पडताना मास्क वापरण्याचा सल्ला देत आहेत. तरीही काही मंडळी याकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा लोकांवर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार संतापला आहे. मास्क न घालता फोटो काढायला आलेल्या फोटोग्राफर्सला अक्षय कुमारने खडेबोल सुनावले आहेत.

अक्षय कुमार आपल्या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनसाठी जुहू येथील स्टुडिओमध्ये गेला होता. त्यावेळी तिथे फोटो काढण्यासाठी आलेल्या फोटोग्राफर्सच्या तोंडावर मास्क नव्हते. या फोटोग्राफर्सवर अक्षय संतापला. मास्क घातला नाही तर तुम्हाला मी फोटो काढू देणार नाही अशी धमकीच त्याने दिली. त्याच्या धमकीला घाबरुन त्या फोटोग्राफर्सने मास्क घातले. अक्षयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. देशभरासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच असला, तरी देखील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे दिसत आहे.

राज्यातील कोरोनामुक्त रुग्ण संख्या आता दीड लाखाच्या उंबरठ्यावर आली असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्यात आज ३ हजार ३४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१५ टक्के असून, आतापर्यंत राज्यात १ लाख ४० हजार ३२५ जणांनी करोनावर मात केली आहे. दरम्यान, सध्या राज्यात १ लाख ३ हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे.