Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूडचा ‘शेहजादा’ घेऊन येतोय अॅक्शन ड्रामा; ‘या’ दिवशी होणार धमाकेदार ट्रेलर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 7, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Shehzada
0
SHARES
60
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेसृष्टीचा चॉकलेट हिरो अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच आपल्याला आगामी चित्रपट ‘शेहजादा’च्या माध्यमातून भेटायला येत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासून प्रेक्षकांमध्ये एक विशेष उत्सुकता पहायला मिळाली आहे. कार्तिक आर्यनच्या वाढदिवसाचे निमित्त साधून ‘शेहजादा’ या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. ज्यामुळे चित्रपटाबाबत आणखीच उत्सुकता ताणली गेली. अखेर आता निर्मात्यांनी ‘शेहजादा’च्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

अभिनेता कार्तिक आर्यन स्टारर ‘शेहजादा’ या चित्रपटाचा ट्रेलर येत्या शुक्रवारी १२ जानेवारी २०२३ रोजी सोशल मीडियावर प्रदर्शित होणार आहे. अशी माहिती ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर दिली आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन एका अनोख्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका वेगळ्या अंदाजात आणि एका वेगळ्या शैलीत कार्तिक प्रेक्षकांने मन जिंकणार का.? याबाबत विशेष उत्सुकता आहे. कार्तिक ‘शेहजादा’ या चित्रपटातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. त्यामुळे चॉकलेट हिरो ते थेट अॅक्शन हिरो अशी त्याची ओळख होऊ शकते.

कार्तिकच्या अनोख्या अंदाजाची एक झलक ‘शेहजादा’च्या टीझरमध्येच पहायला मिळाली होती. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यनसोबत बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन आणि मनीषा कोईराला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. माहितीनुसार, ‘शेहजादा’च्या ट्रेलर लॉन्चसाठी निर्माते जय्यत तयारी करत आहेत. हा लॉन्च सोहळा भव्यदिव्य होणार असल्याचे बोलले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

‘शेहजादा’चा ट्रेलर रिलीज हा ३ दिवसीय कार्यक्रम असणार आहे. ज्याची सुरुवात १२ जानेवारीला मुंबईतून होईल आणि १३ जानेवारीला चित्रपटातील कलाकार कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन जालंधरमध्ये लोहरी साजरी करतील. पुढे १४ जानेवारीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर कच्छमध्ये ‘शेहजादा’चा ट्रेलर रिलीज होईल. कार्तिक आर्यन स्टारर ‘शेहजादा’ हा चित्रपट येत्या १० फेब्रुवारी २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Tags: Bollywood Upcoming MovieKartik aryanKriti sanonShehzadaviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group