Take a fresh look at your lifestyle.

ढगफुटीदरम्यान बेपत्ता झालेल्या गायकाचा करेरी लेकमध्ये सापडला मृतदेह

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे झालेल्या अतिवृष्टीदरम्यान ढगफुटी झाली होती. या ढगफुटीमध्ये अनेकांचे आर्थिक आणि तितकेच जीवित नुकसानही झाले. कित्येकांनी आपले प्रियजन गमावले. या दरम्यान बेपत्ता झालेले सुफी सिंगर मनमीत सिंग यांचा कुठेही शोध लागत नव्हता. त्यानंतर आता ते सापडले आहेत मात्र मृत अवस्थेत. ते सापडतील या आहेत जगणाऱ्या कुटुंबीयांसमोर त्यांचा थेट मृतदेहच समोर आला. त्यांचा मृतदेह कांग्रा जिल्ह्यातील करेरी लेकमध्ये सापडला आहे. मनमीत यांच्या अशा अकाली निधनाच्या वृत्ताने त्यांचे कुटुंबीय तर निश्चितच धक्क्यात आहेत मात्र त्यांच्या चाहत्यांनासुद्धा कळेनासे झाले आहे.

 

सुफी गाण्यांसाठी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या संगीत बंधू तसेच सैन बंधूंपैकी एक म्हणजेच सुफी गायक मनमीत सिंग हे होते. मनमीत सिंग हे भाऊ कर्णपाल आणि आपल्या काही मित्रांसोबत शनिवारी (१० जुलै २०२१ रोजी) धर्मशाळा येथे पोहोचले होते. रविवारी सकाळी सर्वजण धर्मशाळा येथून करेरी या ठिकाणी फिरण्यासाठी म्हणून निघाले होते. दरम्यान रात्रीच्या वेळी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला आणि रात्री या सर्वांनी होते तिथेच मुक्काम करण्याचे ठरविले आणि थांबले. पुढे सोमवारी सकाळी परतत असताना एक मोठा खड्डा पार करत असताना मनमीत त्या पाण्यात वाहून गेले.

या घटनेदरम्यान मनमित यांचा भाऊ कर्णपाल आणि मित्र यांनी त्यांना शोधण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले. अगदी रात्रीचा दिवस केला. पण त्या सगळ्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यांना मनमित कुठे आहेत याचा जराही थांगपत्ता लागला नाही. यानंतर त्यांना शोधण्यासाठी एका रेस्क्यू टीमला गाठण्यात आले आणि अखेर मंगळवारी रात्री खूप उशीरा मनमीत यांचा थेट मृतदेहच सापडला. यानंतर त्यांच्या घरी हि दुःखद बातमी सांगण्यात आली. मनमीत यांच्या मृत्यूच्या बातमीने त्यांचे संपूर्ण कुटुंब चांगलेच हादरलेआणि त्यांच्या चाहत्यांना असह्य धक्का बसला आहे. मुळात मनमीत पंजाबच्या अमृतसरचे राहणारे होते. ‘दुनियादारी’ या गाण्याने त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्या निधनाने सध्या सुफी जगतामध्ये शोककळा पसरली आहे.