Take a fresh look at your lifestyle.

‘मोटार गाडी नको.. वेळेवर पोचायला लोकल बरी’; अभिनेत्याचा कमाल फंडा चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मित्रांनो तुम्ही कधी कोणत्या सेलेब्रिटीला लोकलमधून प्रवास करताना पाहिलं आहे का..? अहो पाहिलं असाल पण कदाचित ओळखलं नसाल. कारण असे बरेच कलाकार मंडळी आहेत ज्यांना साधं सोप्प सामान्य जगायला आवडत तर काही असे आहेत ज्यांना पब्लिसिटी स्टंट करायला आवडत. असं सोप्प जगणाऱ्यांमध्ये बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचं नाव अगदी सहज कुणीही घेईल. शिवाय त्याने ते सिद्धही करून दाखवलय. अलीकडेच एका कार्यक्रमाला वेळेत पोहचायचे म्हणून साहेब थेट लोकलने प्रवास करून गेले. त्याचा हा आनंदच लोकांना फारच आवडला आहे.

त्याच झालं असं कि, नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या आगामी चित्रपटामूळे फार व्यस्त आहे. या चित्रपटाचं मीरारोड येथे चित्रीकरण सुरु आहे. दरम्यान त्याला एका इव्हेंटमध्ये हजेरी लावायची होती. परंतु, हे ठिकाण शूटिंग सेटपासून फारच दूर असल्यामुळे त्याला वेळेत कार्यक्रमाला हजेरी लावता येणे अशक्य होते. त्यात मुंबईच ट्राफिक सगळ्यांचा माहित आहे. त्यामुळे मग वेळेत पोहचायचेच असा निर्धार करीत नवाज थेट रेल्वे स्टेशनला पोहोचला. नुसता पोहचला नाहीत तर त्याने ट्रेनने प्रवाससुद्धा केला. त्याच्या या लोकल प्रवासाचा व्हिडीओ त्यानेच सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

नवाजकडे एकापेक्षा एक भारी अशा लक्झरी मोटार गाड्या आहेत. पण तरीही त्याने सार्वजनिक वाहतुकीकरणाचा वापर केला. त्याच काय आहे.. कोणताही सेलिब्रिटी सार्वजनिक ठिकाणी दिसला कि चाहते त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि त्याला भेटण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळेच ही कलाकार मंडळी कारमधून बाहेरच पडत नाहीत. पण बॉलिवूडच्या या कलाकाराने कमालच केली. कोणत्याही अंगरक्षकाशिवाय चक्क मुंबई लोकल ट्रेनने प्रवास केला. त्यातही सामान्यांच्या गर्दीत प्रवास करत असताना एकाही व्यक्तीने त्याला ओळखलं नाही हे विशेषच आहे. त्यामुळे हा व्हिडीओ आणि नवाजचा फंडा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.