हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । तुम्हाला कदाचित धर्मेंद्र आणि हेमा मालिनीचा सुपरहिट चित्रपट ‘द बर्निंग ट्रेन’ आठवत असेल. सध्याच्या सिक्वल आणि रीमेकच्या काळात या चित्रपटाचाही रीमेक येणार आहे. १९८० च्या सुपरहिट फिल्म ‘द बर्निंग ट्रेन’ चा रीमेक बनणार असल्याची बातमी येत आहे. या चित्रपटाच्या रीमेकसाठी जुनो चोप्रा आणि जॅकी भगनानी यांनी तयारी केली आहे. लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल.’द बर्निंग ट्रेन’ मध्ये धर्मेंद्र,
विनोद खन्ना, जितेंद्र आणि डॅनी यांनीही उत्कृष्ट भूमिका साकारल्या.
फिल्म समीक्षक तरण आदर्शने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरन ही माहिती दिली. त्यांनी लिहिले की, ‘रवि चोप्रा दिग्दर्शित’ १९८०च्या ‘द बर्निंग ट्रेन’ या चित्रपटाचा रिमेक जॅकी भगनानी आणि जुनो चोप्रा बनवणार आहेत. सध्याला चित्रपटाची स्क्रिप्ट आणि कास्टिंगचे काम केले जात आहे, तर या चित्रपटासाठी दिग्दर्शकाचाही शोध सुरु आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर शूटिंगचे काम सुरू होईल.
१९८० मध्ये बनलेली ‘द बर्निंग ट्रेन’ या कथेबद्दल बोलायचे तर हि कथा ही ट्रेन बनवण्यावर आणि तिचा पहिला खळबळजनक प्रवास यावर आधारित आहे. या चित्रपटात धर्मेंद्र, हेमा मालिनी, विनोद खन्ना, जितेंद्र, नीतू सिंह हे इतर लोकांना जळत्या ट्रेनमधून सुखरुप बाहेर काढले आहे. डॅनी या सिनेमातील खलनायक होता जो या ट्रेनला आग लावतो. या चित्रपटाची गाणीही चांगलीच गाजली.