Take a fresh look at your lifestyle.

देवमाणूस घेणार प्रेक्षकांचा निरोप तर विजय कदम करणार गूढमय मालिकेतून पुनरागमन; पहा प्रोमो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेच्या सत्य घटनेवर आधारित असलेल्या आणि अनोख्या कथानकाने प्रेक्षकांची विशेष पसंती मिळविली. या मालिकेने प्रेक्षकांना असे खिळवून ठेवले कि एक विशेष लोकप्रियतेचे शिखर मालिकेने गाठले. प्रेक्षकांनी या मालिकेवर आणि मालिकेतील प्रत्येक पात्रावर अगदी मनापासून जीव लावला आणि भरपूर प्रेम केले. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

यामुळे अनेक प्रेक्षकांचा हिरमोड होणे साहजिक आहे मात्र यासोबत एक आनंदाची बातमी म्हणजे त्याजागी एक नवीन गूढमय मालिका येत्या महिन्यात १६ ऑगस्ट २०२१ पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचे शीर्षक ‘ती परत आलीये’ असे आहे.

या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. विशेष बाब म्हणजे बऱ्याच काळानंतर जेष्ठ अभिनेते विजय कदम या मालिकेत एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत. विजय कदम बऱ्याच कालावधीनंतर मालिकेच्या निमित्ताने मनोरंजन विश्वात पुन्हा दिसणार आहेत. या प्रोमोमध्ये विजय कदम एका परिसरात गस्त घालताना दिसत आहेत आणि नेमकी त्या परिसरामध्ये हत्या होते. त्यामुळे सावध राहा अशी चेतावनी देताना ते दिसत आहेत. नक्की घडतंय काय आहे? हे गूढ जाणून घेण्यासाठी हि मालिका पाहणे गरजेचे ठरणार आहे. शिवाय या मालिकेत अजून कोण कलाकार असणार? याबाबतची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.

आणखी एक विशेष बाब अशी कि, या मालिकेचे लेखन ‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकेचे लेखक स्वप्नील गांगुर्डे यांनीच केले आहे. त्यामुळे ही मालिकासुद्धा प्रेक्षकांचे मन जिंकणार यात काही वादच नाही. या मालिकेबद्दल बोलताना विजय कदम म्हणाले कि, “या मालिकेत एक रहस्यमय भागातील गूढ प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इकडे आलेल्या लोकांचं काही रहस्य आहे का? ती परत आलीये म्हणजे नक्की कोण? या प्रश्नाची उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळतील. एका रहस्यमय मालिकेत काम करताना मी खूप उत्सुक आहे. माझी भूमिका नक्की काय आहे हे सगळ्यांना लवकरच कळेल. प्रेक्षक या भूमिकेवर प्रेम करतील अशी माझी खात्री आहे.” ‘ती परत आलीये’ हि मालिका १६ ऑगस्ट २०२१ पासून रात्री १०.३० वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.