Take a fresh look at your lifestyle.

दुःखद! ‘अंधा कानून’ चित्रपटाचे दिग्दर्शक टी. रामा राव यांचे निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘अंधा कानून’ या सुपर हिट चित्रपटाचे दिग्दर्शक टी रामा राव यांचे निधन झाल्यामुळे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली. दरम्यान ते ८४ वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार दीर्घकालीन आजारपणामुळे त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितल्याप्रमाणे ते गेल्या अनेक दिवसांपासून सतत आजारी होते. अखेर उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. आज (बुधवार दिनांक २० एप्रिल २०२२ रोजी) चेन्नई येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिले आहे.

रिपोर्टनुसार, दिग्दर्शक टी रामा राव हे गेल्या कित्येक दिवसांपासून सतत आजारी होते. त्यामुळे त्यांना योग्य ते उपचार मिळणे हेतू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरु असताना रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाच्या बातमीस दुजोरा दिला आहे. आज त्यांचे पार्थिव त्यांच्या घरी अंत्य दर्शन घेण्यासाठी ठेवले जाईल आणि नंतर त्यावर अंत्य संस्कार केले जातील. दरम्यान, रामा राव याना श्रद्धांजली वाहताना अभिनेता अनुपम खेर यांनी ट्विट केले आहे. यात त्यांनी लिहिले कि, “अनुभवी चित्रपट निर्माते आणि जवळचे मित्र #TRAmaRao जी यांच्या निधनाचं वृत्त ऐकून प्रचंड दु:ख झालं आहे. मी त्यांच्यासोबत ‘आखिरी रास्ता’ आणि ‘संसार’ या चित्रपटासाठी काम केलं होतं. जे माझं सौभाग्य होतं. ते प्रेमळ, दयाळू आणि तितकेच समजूतदार होते. त्यांचा सेंस ऑफ ह्यूमर ग्रेट होता. त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे”.

टी रामा राव हे दाक्षिणात्य कलाविश्वातील एक नामांकित नाव आहे. ते एक प्रसिद्ध दिग्दर्शक होते. त्यांनी अनेक गाजलेल्या हिट पे हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. राव यांनी १९६६ सालापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर त्यांनी २००० पर्यंत सलग सुपरहिट चित्रपट दिले. ‘जीवन तरंगल’, ‘अनुराग देवता’ आणि ‘पचानी कपूरम’ हे त्यांचे तेलुगू भाषिक चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरले. तर बॉलिवूड सिनेसृष्टीमधील ‘अंधा कानून’, ‘एक ही भूल’, ‘मुझे इंसाफ चाहिए’ आणि ‘नाचे मयूरी’ या चित्रपटांसाठी त्यांना ओळखले जाते.