Take a fresh look at your lifestyle.

बहुचर्चित वेबसिरीज “द फॅमिली मॅन’चे आगामी पर्व लवकरच होणार प्रदर्शित

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत गाजलेली आणि लोकांच्या चर्चेत रंगलेली वेबसिरीज द फॅमिली मॅन च्या यशानंतर आता लवकरच तिचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हि वेबसिरीज २०१९ साली प्रदर्शित झाली होती. या वेबसिरीजमध्ये बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत झळकला होता. आता लवकरच या वेबसिरीजचा दुसरा भाग प्रेक्षकांसाठी याच महिन्यात उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या वेबसीरिजचा पहिला भाग प्रेक्षकांना खूपच आवडला होता. तेव्हाच ‘द फॅमिली मॅन २′ आणण्याची तयारी सुरू झाली होती.

जानेवारीमध्ये या वेबसिरीजचा टीजर प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून ही वेबसिरीज कधी प्रदर्शित होणार, याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. ‘तांडव’ ही वेबसिरीज रिलीज करतेवेळी जे वाद निर्माण झाले, त्यामुळे ‘द फॅमिली मॅन २′ देखील प्रदर्शित करणे लांबणीवर टाकले होते. मात्र, आता या वेबसिरीजचा नवाकोरा सीझन यावर्षीच आणि याच उन्हाळ्यात प्रेक्षकांना बघायला मिळेल, असे निर्मात्यांनी घोषित केले आहे. या जूनमध्ये हा नवीन सीझन ऍमेझोन प्राईमवर प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे.

या सीझनमध्ये अभिनेता मनोज वाजपेयींबरोबर समंथा अक्किनेनी या दाक्षिणात्य अभिनेत्रीने मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या वेबसिरिजच्या निमित्ताने ती डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहे. नुकताच तिचा वाढदिवस होऊन गेला. तेव्हा तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर दिलेल्या शुभेच्छांमध्ये निर्मात्यांनी तसे सूतोवाच केले आहे. ‘द फॅमिली मॅन २′ चा टीजर बघितल्यावर मनोज वाजपेयीचा बदललेला अंदाज लक्षात येतो. मुसा जिवंत आहे की मृत, याचा उलगडा या आगामी सीझनमध्ये होणार आहे.