Take a fresh look at your lifestyle.

‘द फॅमिली मॅन २’ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओटीटी प्लॅटफॉर्मवर चर्चेत असलेली वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन २’चा नुकताच जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या वेबसीरिजची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. अखेर आज या वेब सिरीजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झालाच. जवळपास अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये अभिनेता मनोज बाजपेयी दिसत आहे आणि तो प्रेक्षकांची मने पुन्हा एकदा जिंकण्यासाठी तयार आहे. या ट्रेलरमध्ये मनोज यांच्या अभिनयावरून नजर हटता हटत नाही आहे. येत्या ४ जून २०२१ रोजी ही सीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

या ट्रेलरमध्ये मनोज बाजपेयी हा अभिनेता कुटुंब, ऑफिस आणि देश या तिन्ही जबाबदाऱ्या एकाचवेळी खांद्यावर घेऊन पूर्ण करताना दिसत आहे. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. या सीरिजच्या माध्यमातून अभिनेत्री समंथा हिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर जबरदस्त पदार्पण केले आहे. यामध्ये ती रज्जी नामक भूमिका साकारत आहे. त्यासोबतच सीमा बिस्वास, सनी हिंदुजा, दर्शन कुमार, श्रेया धन्वंतरी, मिमे गुप्ता यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

दिग्दर्शन राज एंड डीके यांनी या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. या वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनमध्ये अनेक नव्या पात्रांचा समावेश आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ट्रेलरच्या रिलीजनंतर पुन्हा एकदा अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले जात आहे. नावाप्रमाणेच सीरिजमध्ये मनोज बाजपेयी हा अगदी ‘फॅमिली मॅन’ आहे. त्याला पत्नी आणि दोन मुले आहेत. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत तो राष्ट्रीय तपास यंत्रणेत गूढरित्या काम करत असतो. या सगळ्यात त्याला दहशतवादी मिशनचा अलर्ट मिळतो. म्हणून हे मिशन हाणून पाडण्यासाठी हा नायक काय काय करतो, यात त्याला कोणाची साथ मिळते यावर दहा एपिसोडची ही रंजक वेबसीरिज साकारली आहे.