Take a fresh look at your lifestyle.

हृदयविकाराच्या झटक्याने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । उत्तराखंडातील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री रिना रावतचं हृद्य विकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ही घटना गुरुवारी घडली. रीना ही फक्त 38 वर्षांची होती. तिचे अचानक निधन झाल्यामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

rina ravt

रिना उत्तराखंडांतील प्रादेशिक भाषेतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने ‘पुष्पा छोरी…’ या लोकगीतासोबतच भग्यान बेटी, मायाजाल, फ्योंली ज्वान व्हेगी या सुपरहिट गाण्यांमध्ये तिने अभिनय केला आहे.  अभिनेता पन्नू गुंसाईने सोशल मीडियावर रिनाचा फोटो शेअर करत तिच्या आठवणींना उजाळा दिला होता. तसेत त्या दोघांचा एक टिकटॉक व्हिडिओ देखील पोस्ट केला होता.

रिना गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने तिला दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल असताना तिने पन्नूशी संपर्क साधला होता. त्यावेळी पन्नू रिनाला जाऊन भेटला देखील होता असे देखील त्याने पोस्टद्वारे म्हटले आहे.