वेबकिडा | या वर्षाची पहिली हिंदी अॅमेझॉन प्राइम ओरिजनल वेब सीरिज ‘द फरगॉटन आर्मी’ रिलीज झाली आहे. बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक कबीर खानने या वेब सिरीजद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. ही वेब सिरीज 24 जानेवारी रोजी रॅलीज झाली. विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने यात कॅप्टन सोढीची भूमिका केली आहे. तर मराठमोळी शर्वरी वाघ माया श्रीवास्तवच्या भूमिकेत दिसली आहे.
ही सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद फौजेची कथा आहे. आपला देश स्वतंत्र करण्याचा आझाद हिंद फौजचा निर्धार हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सैन्याच्या दृष्टीकोनातून चित्रित करण्यात आला आहे. सैन्याच्या स्थापनेपासून त्यानंतरच्या युद्धापर्यंतची कहाणी आहे. दुसर्या महायुद्धानंतर सिंगापूर आणि म्यानमारमध्ये हजर असलेल्या या सैन्याने दिल्लीत जाण्याचा नारा दिला आणि नंतर ब्रिटीश राज्यापासून स्वातंत्र्यासाठी लढा दिला. दुसर्या महायुद्धात लिहिलेल्या आझाद हिंद फौजच्या कथेविषयी बहुतेक भारतीय अज्ञात आहेत. या सेनेच्या उदय आणि अंताची कहाणी भारतीयांपर्यंत नेण्याची जबाबदारी स्वीकारून चित्रपट निर्माते व दिग्दर्शक कबीर खान यांनी ही वेबसिरीज तयार केली आहे.
या मालिकेचा पहिला भाग INA जवानापासून सुरू होतो जो आता म्हातारा झाला आहे आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या सुमारे 48 वर्षांनंतर सिंगापूरला आला आहे. सिंगापूर हे INA चा अड्डा मानले जाते कारण इंग्रज सरकारच्या मूर्खपणामुळे भारतीय ब्रिटिश सैन्याच्या ९०,००० सैनिकांनी येथे बहादुरीने लढा देऊनही केवळ ३०,००० जपानी सैनिकांसमोर हार पत्करली होती.
दुसर्या महायुद्धात जपानी सरकारने ब्रिटीशांना आपला शत्रू मानले तर भारतीय त्याचे मित्र होते. कबीर खानच्या या वेब सिरीजनुसार, जपानी सरकार महात्मा गांधींचा खूप आदर करत असे कारण गांधी ब्रिटिशांविरूद्ध लढत होते. जपानच्या सैनिकांनी बंदि असलेल्या ब्रिटीश भारतीय सैनिकांना आश्वासन दिले की ते भारताला मुक्त करण्यात मदत करतील. आयएनएचे सैनिक जपानी सैन्यात सामील होतात आणि ब्रिटिशांविरूद्ध लढाई करून त्यांचा पराभव होतो. त्यामुळे आयएनएला भारताच्या स्वातंत्र्याचे श्रेय दिले जात नाही.
युद्धापेक्षा आपल्या बॉलीवूडकरांना लव्ह स्टोरीत असलेला रस पुन्हा दिसतो आणि पुन्हा खटकतो. नवख्या सानी कौशलने चांगला अभिनय केला असून शर्वरी ठीकठाक वाटते. यात बरीच अनुभवी स्टारकास्ट तुम्हाला बघायला मिळेल.
ही मालिका पाहण्यासाठी एखाद्या क्लासिक मालिकेसारखा पेशन्स आवश्यक आहे. सुरुवातीच्या काळात मामा पुतण्यांच्या संभाषणाचे दृश्य जरा विचित्र वाटतात. पण ही गोष्ट तरीही तुमच्यात पुढील भागासाठी इंटरेस्ट तयार करते. कबीर खानने त्याच्या पॉप्युलर स्टाईलमध्येच सिरीज तयार केली आहे. त्याच्यावर व्यावसायिक पठडीतील स्टोरीटेलिंग चा परिणाम सहज दिसून येतो.
रेटिंग – ३.५ / ५