Take a fresh look at your lifestyle.

कालपर्यंत ग्लॅमरस दिसणाऱ्या अभिनेत्रीचे झाले भूत; पहा हा भयानक व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही तासांपासून सोशल मीडियाच्या प्रत्येक साईटवर बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा एक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसतो आहे. हा फोटो पाहून अनेकजणांनी घाबरगुंडी उडाली आहे. तर कित्येकांना घामच फुटला. या फोटोतील अभिनेत्रीला तुम्ही ओळखला असाल अशी अपेक्षा आहे. पण ओळखला नसाल तर आम्ही सांगू इच्छितो कि हे भूत दुसरं तिसरं कुणी नसून बॉलिवूड जगतातील अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री शिल्पा शेट्टी- कुंद्रा आहे.

 

सुपर डान्सरमध्ये शिल्पा शेट्टीची एक अगदीच वेगळी अनपेक्षित अदा नव्हे तर भयानक अशी बाजू दिसून आली. अनुराग बसूने त्याला ‘बदले की आग’ असेसुद्धा म्हटले आहे. कोरिओग्राफर वैभव घुगे याने या आणि मागच्या पर्वात शिल्पाला सतत घाबरवले व सतावले आहे. त्यामुळे आता वेळ त्याची होती. शिल्पाने बरोबर व्याजासकट वैभवची चाल त्याच्यावरच उलटवून परतफेड केली आहे. नुकतेच सुपर डान्सर सीझन ४ चे शूटिंग सुरू असताना शिल्पाला संधी मिळाली आणि तिने सापळा रचला. नेमका त्यात वैभव सापडला आणि मग काय सगळ्यांनीच शिल्पाला अगदी ‘साष्टांग दंडवत’ घातले.

यावर शिल्पा म्हणाली, “सुपर डान्सरच्या सगळ्या सीझनमध्ये, प्रत्येक वेळी वैभवने मला चकवले, घाबरवले की मी मनोमन याची परतफेड करण्याचे ठरवत असे. आम्ही दमणमध्ये या शोचे शूटिंग करत होतो, त्यामुळे मला पलटवार करण्याची नामी संधी मिळाली. मी अशा तयारीने निघाले, की दमणला एक दिवस आधी पोहोचता येईल. माझ्या टीमने माझ्या मेकअपचा खूप बारकाईने विचार केला होता आणि मी स्वतःला आरशात पाहिले, तेव्हा तो मेकअप पाहून स्वतः मी देखील दचकले”. मी यापूर्वीही सांगितले आहे की, सुपर डान्सरचा संपूर्ण क्रू माझ्या कुटुंबासारखा आहे. त्यामुळे, अशा वेळी मला खूप मजा येते.

हा मेकअप करण्यासाठी शिल्पाला तीन तास लागले. हॉटेलच्या दारापाशी ती लपून बसली आणि दारातून आत येणार्‍या कोरिओग्राफर्सना तिने झडप घालून घाबरवले. यावर वैभव म्हणाला, “सुपर डान्सरशी निगडीत असलेल्या माझ्यासहित सगळ्यांसाठी शिल्पा मॅम एक प्रेरणा आहेत. मी त्यांना इतक्या वेळा घाबरवले आणि त्यांच्या खोड्या काढल्या, पण त्यांनी यावेळी आम्हाला जे घाबरवले तो प्रकार त्या सगळ्यावर कुरघोडी करणारा होता. एक दिवस आधी येऊन, तासन् तास चिकाटीने बसून मेक करून आमच्यासाठी त्यांचे हे करणे आम्हाला विशेष असल्याची जाणीव देणारे आहे. मला नाही वाटत की यापूर्वी कोणत्याही सेलिब्रिटी परीक्षकाने असे काही केले असेल. मी घाबरलो का? अर्थात, घाबरलो!”