Take a fresh look at your lifestyle.

स्टे सेफ महेशअण्णा हा हॅशटॅग ट्विटरवर होतोय ट्रेंड; ५०००हुन अधिक ट्विट्सचा आकडा पार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कालपासून ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर हॅशटॅग स्टे सेफ महेशअण्णा हा हॅशटॅग जबरदस्त ट्रेंड होतोय. खरतर केवळ ट्विटरवरच नव्हे तर सगळ्याच सोशल मीडिया साईट्सवर या हॅशटॅगची चर्चा रंगली आहे. हा हॅशटॅग ट्रेंडिंग मध्ये असण्याचे नेमके कारण तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर याचे कारण असे कि, दाक्षिणात्य सुपरस्टार महेशबाबू याच्या कुटुंबातील सर्वानाच कोरोनाची लागण झाली आहे. हि बातमी समजताच त्याच्या चाहत्यांनी त्याने स्वतःची काळजी घ्यावी म्हणून हा हॅशटॅग वायरल केला आहे.

आतापर्यंत या हॅशटॅगने ५००० ट्विट्स चा आकडा पार केला आहे. हा हॅशटॅग लवकरच राष्ट्रीय पातळी गाठणार असे दिसू लागले आहे.  दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूच्या स्टायलिस्टला कोरोनाची लागण झाली असल्याची बातमी समोर येत आहे. यामुळे महेश बाबूने स्वतःला आपल्या कुटुंबासोबत आयसोलेट करून घेतले आहे. तसेच तो सध्या चित्रीकरण करत असलेल्या सरकारू वारी पाटा या चित्रपटाच्या टीम क्रूमधील अनेक सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने काळजीचे वातावरण पसरले आहे.

 

महेश बाबू आणि त्याचे संपूर्ण कुटुंब त्याच्या हैद्राबादमधील राहत्या घरी क्वारंटाईन आहेत. याबाबतची माहिती महेशच्या चाहत्यांना समजल्यानंतर त्यांच्यात काळजीचे वातावरण पसरले आहे. महेश बाबूने स्वतःची काळजी घ्यावी असे सांगत त्याचे असंख्य चाहते सोशल मीडियावर सातत्याने ट्वीट करत आहेत. त्यामुळे ट्विटरवर स्टे सेफ महेशअण्णा हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. महेश बाबू टॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. महेश बाबूने बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. महेश बाबू हा दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याचे फॅन फॉलोव्हिंग जबरदस्त आहे.