Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूड सिंगर अरिजीत सिंगच्या आईची प्रकृती चिंताजनक; A निगेटिव्ह रक्तदात्याची गरज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या सुरेल आवाजाने मंत्रमुग्ध करणारा बॉलिवूड सिंगर अरिजीत सिंह याच्या आईची प्रकृती काल अचानक बिघडली. दरम्यान त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांच्या तब्येतीबाबत आणखीच चिंताजनक वृत्त येत आहे. दरम्यान ‘दिल बेचारा’ व ‘पाताललोक’ फेम अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. त्यांनी अरिजीतच्या आईला A निगेटिव्ह रक्ताची गरज असल्याचे सांगितले आहे. तर बांगला रिपब्लिक इनपुट एडिटर मयूख घोष यांनीही A निगेटिव्ह रक्तदात्याची गरज असल्याचे ट्विट केले आहे.

स्वस्तिकाने आज गुरूवारी सकाळी १० वाजून ०७ मिनिटांनी ट्विटरवर एक पोस्ट केली. यात तिने लिहिले, ‘अरिजीत सिंगच्या आईची प्रकृती अचानक बिघडली आहे. तिला ए निगेटिव्ह रक्ताची तात्काळ गरज आहे.’ तर मयूर घोष यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, सिंगर अरिजित सिंग याच्या आईला या निगेटिव्ह रक्ताची गरज आहे. ज्याला कुणाला रक्तदान करणे शक्य आहे त्याने संपर्क साधा. अरिजीतच्या आईला कोलकात्याच्या एएमआरआय, ढाकुरिया रूग्णालयात भरती करण्यात आले असून ब्लड डोनर पुरूषच हवा, असेही ट्विटमध्ये लिहिलेले आहे.

मात्र अरिजीतच्या आईला नेमके काय झाले आहे? त्यांची प्रकृती का व कश्यामुळे बिघडली? त्यांना तात्काळ रूग्णालयात का भरती केले? व आता त्यांना रक्ताची गरज का भासत आहे? असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले आहेत. मात्र अद्याप यासंदर्भात सर्व काही अस्पष्ट आहे. याबाबत अजूनतरी कोणतेही स्पष्टीकरण अरिजित वा इतर कोणीही दिलेले नाही. सध्या अरिजीतच्या आईची प्रकृती चिंताजनक आहे. तर यामुळे अरिजीतच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण पसरले आहे.