Take a fresh look at your lifestyle.

‘महाभारत’ मालिकेतील भीम साकारणाऱ्या नायकावर आली उपासमारीची वेळ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| एकेकाळी छोटा पडदा गाजवलेली अध्यात्मिक मालिका महाभारत आजही लोकांच्या लक्षात आहे. याचे कारण म्हणजे मालिकेतील पात्र साकारणाऱ्या कलाकारांनी ते पात्र उठून दिसावे म्हणून केलेली मेहनत. महाभारत मालिका गाजली त्याचे हे एकमेव कारण आहे. लॉक डाऊन दरम्यान या मालिकेचे पुनः प्रसारण केले आणि याहीवेळी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. असे असतानाही आज या मालिकेतील भीमचे पात्र साकारणाऱ्या नायकावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत खुद्द अभिनेता प्रवीण कुमार सोबती यांनी आपली व्यथा व्यक्त केली आहे.

आज प्रवीण यांचे वय ७२ असून ते अत्यंत हलाखीच्या काळातून जात आहेत. त्यांनी आपल्या परिस्थितीविषयी भाष्य करताना म्हंटले की, गेली अनेक वर्ष त्यांच्याकडे काम नसल्यामुळे ते घरीच आहेत आणि आता या वयात काम करणे शक्य नाही. अश्यात त्यांच्या नातेवाईकांनी पाठ फिरवली आहे. त्यांची पत्नी शक्य ते सर्व काही त्यांच्या काळजीपोटी करते. त्यांना एक मुलगी असून ती विवाहित आहे त्यामुळे तिच्याकडे कोणतीही अपेक्षा नाही. परिणामी ते आपल्या पत्नीसोबत जमेल तसे दिवस काढत आहेत.

अभिनेते प्रवीण कुमार सोबती यांचा जन्म पंजाबच्या अमृतसर येथील आहे. त्यांनी १९६६ साली कॉमन वेल्थमध्ये सिल्वर मेडल आणि एशियन स्पर्धेत २ वेळा गोल्ड मेडल जिंकल आहे. असे असूनही त्यांची आर्थिक स्थिती बरी नाही. यामुळे त्यांनी सरकारवर आपली तीव्र नाराजी दाखवली आहे. त्यांनी सांगितले इतकी मेडल जिंकूनही मला सरकारने साधी पेन्शन दिली नाही. सध्या BSF ची पेन्शन सुरू आहे पण ती अपुरी आहे. अशी माहिती अभिनेत्याने दिली.