Take a fresh look at your lifestyle.

‘द काश्मीर फाईल्स’ची बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई; वादग्रस्त वातावरणातही 100 कोटींचा गल्ला

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काश्मिरी पंडितांच्या जीवनाचे भाष्य करणारा ‘द काश्मीर फाईल्स’ ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला आहे. यानंतर चित्रपटाबाबत दोन वेगवेगळ्या गटांनी आपली मते प्रखरपणे व्यक्त केल्याने वाद निर्माण झाले. मात्र तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कामे केली आहे. अगदी ८ दिवसांत म्हणजेच आठवड्याभरात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ११६.४५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबद्दलची माहिती दिली.

ट्विटवरून माहिती देताना तरण आदर्श यांनी लिहिले आहे कि, ‘द काश्मीर फाईल्स’च्या आठव्या दिवसाची कमाई ही आमिर खानच्या दंगल या चित्रपटाच्या आठव्या दिवसाच्या कमाईपेक्षा अधिक आहे. तर ‘बाहुबली २’पेक्षा थोडी कमी आहे. ‘बाहुबली २’ने आठव्या दिवशी १९.७५ कोटी रुपये कमावले होते. तर दंगलने १८.५९ कोटी रुपये कमावले होते. काश्मिरी पंडितांचं दु:ख मांडणारा हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यात १५० कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाजदेखील तरण आदर्श यांच्याकडून वर्तविण्यात आला आहे.

द काश्मीर फाईल्सची कमाई खालीलप्रमाणे-

० शुक्रवार- 3.55 कोटी रुपये
० शनिवार- 8.50 कोटी रुपये
० रविवार- 15.10 कोटी रुपये
० सोमवार- 15.05 कोटी रुपये
० मंगळवार- 18 कोटी रुपये
० बुधवार- 19.05 कोटी रुपये
० गुरुवार- 18.05 कोटी रुपये
० शुक्रवार- 19.15 कोटी रुपये
= एकूण- 116.45 कोटी रुपये

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर यांसह इतरही नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटात १९९० मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा दाखवण्यात आली आहे.