Take a fresh look at your lifestyle.

काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित ‘द कश्मीर फाईल्स’ मार्चमध्ये होणार रिलीज; पहा ट्रेलर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काश्मीर पंडित यांच्या जीवनावर आधारित आणि एक नवे कथानक असणारा ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. निर्मात्यांच्या घोषणेनुसार येत्या ११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होऊ घातला आहे आणि नुकताच त्याचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांची चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढल्याचे दिसून येत आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटात ब्रह्मा दत्तच्या भूमिकेत मिथुन चक्रवर्ती, पुष्करनाथच्या भूमिकेत अनुपम खेर, कृष्णा पंडितच्या भूमिकेत दर्शन कुमार, राधिका मेननच्या भूमिकेत पल्लवी जोशी, श्रद्धा पंडितच्या भूमिकेत भाषा सुंबली, फारूक मलिक हे कलाकार एकत्र पडद्यावर पहायला मिळणार आहेत.

 

याआधी हा चित्रपट गतवर्षी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन रखडले आणि याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. यानंतर आता ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट येत्या ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होतोय. विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल सांगताना एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये चित्रपटाचे प्रदर्शन कोणत्या दिवशी होणार हे आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय कि, ‘तुम्हा सर्वांसाठी ‘द कश्मीर फाईल्स’ लवकरच मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहोत. हा चित्रपट ११ मार्च २०२२ ला रिलीज होणार आहे.’ ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट काश्मिरी पंडिताच्या जीवनावर आधारित असल्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत कुतूहल आणि तितकीच उत्कंठता आहे. सन १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर हा चित्रपट भाष्य करत आहे. या चित्रपटाची कथा हि पूर्णपणे सत्य घटनांवर आधारित आहे.