Take a fresh look at your lifestyle.

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर बॉलिवूड कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ सध्या सर्वत्र चर्चेत आहे. एकतर हा चित्रपट सत्य कथेवर आधारित आहे. याचे कथानक काश्मिरी पंडितांच्या काश्मीर येथून झालेल्या स्थलांतराच्या घटनेचे भाष्य करतो. त्या वेदना, तो त्रास, ते अश्रू आणि काश्मिरी पंडितांनी जगलेले ते दिवस या चित्रपटातून एक भयावह सत्य समोर आणलं गेलं आहे. दरम्यान या चित्रपटाबाबत प्रतिक्रिया देणारे दोन गट असले तरीही बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकारांनी मात्र चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून एक ट्विट करत ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या कलाकृतीचे कौतुक केले आहे. सोबत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. “हा सिनेमा सर्व विक्रम मोडत आहे. ही कौतुकाची वेळ आहे. या सिनेमातील सर्व कलाकारांचं आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं मी अभिनंदन करतो. चित्रपटाच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो”, अशा आशयाचं ट्विट रितेश देशमुखने केले आहे. त्याने या ट्विटमध्ये अनुपम खेर आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना टॅग केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तसेच बॉलिवूड इंडस्ट्रीतील पंगा गर्ल जी सगळ्यांबद्दल चांगलं बोलणं पसंत करत नाही अश्या अभिनेत्री कंगना रनौतनेदेखील या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या सिनेमावर तिने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि, “द काश्मीर फाईल्सच्या टीमला खूप खूप शुभेच्छा. त्यांनी पूर्ण फिल्म इंडस्ट्रीचे जेवढे पाप होते, ते सर्व पाप धुवून टाकले आहेत. बॉलिवूडचेही पाप त्यांनी धुवून टाकले. हा चित्रपट इतका कौतुकास्पद आहे की जे इंडस्ट्रीवाले आपल्या बिळात लपून बसले आहेत, त्यांनी बाहेर येऊन याचं प्रमोशन केलं पाहिजे. नेहमी ते बकवास, सडलेल्या चित्रपटांचं प्रमोशन करतात.”