Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्याने सोनू सूदच्या कानशिलात लगावताच चिमुकल्या चाहत्याला झाला राग अनावर; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सोनू सूद याने कोरोनाच्या संकट काळात मुंबईत अडकून पडलेल्या अनेको गोरगरिब मजुरांना त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबापर्यंत सुखरूप पोहचवण्याचे काम केले होते. सोनू सूदने कोरोना काळात लोकांची अगदी निस्वार्थ सेवा केल्यामुळे लोक त्याला देवाप्रमाणे पुजतात. देशाच्या कानाकोप-यात सोनू त्याच्या याच कामामुळेच प्रसिद्ध झाला आहे. आज त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. प्रत्येक वयोगटात त्याची क्रेझ निर्माण झाली आहे. अगदी लहानांपासून ते वयोवृद्धापर्यंत सोनू साऱ्यांचा लाडका बनला आहे. त्यामुळे सोनूला थोडीही दुखापत झाल्याचे रिअल लाईफप्रमाणे रिल लाईफमध्येही कुणालाच पहावत नाही. असच काहीसं एका चिमुकल्यासोबत आणि त्याने चक्क घरातला टीव्ही फोडून टाकला. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

नुकताच तेलंगणामध्ये राहत असलेल्या सोनू सूदच्या एका चिमुकल्या चाहत्याने सोनूच्या प्रेमापायी घरातला टीव्ही फोडल्याचे समोर आले आहे. एका चित्रपटातील क्षणिक दृष्यामुळे हा मोठा पराक्रम या चिमुकल्याने केला आहे. त्याचे झाले असे की, हा मुलगा त्याच्या घरी सोनू सूदचा ‘ढुकुडु’ हा दाक्षिणात्य चित्रपट मोठ्या उत्साहाने पाहत होता. यात अभिनेता महेश बाबू सोनू सूदला कानशिलात लगावतो हा सीन पाहून या चिमुकल्या चाहत्याला इतका राग आला की बस्स्स्स्स… त्याने थेट हा राग बिचाऱ्या टीव्हीवर काढला आणि टीव्ही फोडूनच टाकला.

या चिमुकल्या चाहत्याने टीव्ही फोडल्याच्या पराक्रमाची बातमी सोनूला कळताच, त्याने ट्विटरवर त्या न्युज चॅनेलच्या बातमीचा व्हिडीओ शेअर करत मजेशीर कॅप्शनही दिले आहे. सोनूने या ट्विटमध्ये लिहीले आहे की, ‘टीव्ही फोडू नका. आता त्याचे वडील मला नवीन टीव्ही द्यायला सांगतील’. हा व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट कॅप्शन्ससोबत शेअर होताना दिसतोय. सोनू सूद गेल्या वर्षपासून निस्वार्थ भावनेने लोकांना मदत करतोय आणि त्याचे हेच मदत कार्य आजही सुरु आहे. कोरोना काळापासून सुरु असलेले त्याचे कार्य असेच यापुढेही अविरत सुरु राहणार असल्यामुळे त्याचे चाहतेही त्याला अगदी भरभरुन आशिर्वाद आणि मनभरून प्रेम करीत आहेत.