Take a fresh look at your lifestyle.

“आई कुठे काय करते” मालिकेच्या सेटवर आला पाहुणा; तो आला, त्याने पाहिलं आणि जिंकली साऱ्यांची मनं

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आई कुठे काय करते हि मालिका स्टार प्रवाह वर प्रदर्शित होते. या मालिकेवर प्रेक्षक अगदी भरभरून प्रेम करीत आहेत. मालिकेतील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात आपली हक्काची जागा निर्माण केली आहे. नुकताच या मालिकेच्या सेटवर एक नवा पाहुणा आला होता. त्या पाहुण्याने मात्र या साऱ्यांची मने जिंकली. आता हा पाहुणा आहे तरी कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ‘आई कुठे काय करते’च्या संवाद लेखिका मुग्धा गोडबोलेचं लहानसं बाळ म्हणजेच तिचा कुत्रा बटरस्कॉच हा सेटवर आला होता. या छोट्या पाहुण्याने सेटवरील सर्वांना स्वतःसोबत खिळवून ठेवले आणि प्रत्येकाच्या मनात प्रेमाचं घर केलं आहे.

‘आई कुठे काय करते’ ही मालिका रंजक वळणावर आली आहे. या मालिकेत ईशा घरी खोटे बोलून साहिलसोबत पनवेलच्या रिसॉर्टला जाते. साहिल तिथे आपण रूम बूक करून चिल्ल करूया म्हणतो. ते सगळं देविका पाहते आणि अरूंधतीला फोन करून सांगते. अरुंधती तिथे येऊन ईशाच्या कानशीलात लगावते आणि तिला घरी येऊन येते. घरी अनिरुद्धला देखील बोलवून घेते. घरी ईशावरून खूप वाद होतात आणि ईशा घरातल्यांना अद्वा तद्वा बोलून यआपल्या खोलीत निघून जाते. रात्री ती अरुंधतीशी बोलत देखील नाही. झोपल्यानंतर अचानक अरूंधतीला जाग येते तेव्हा बाजूला ईशा नसते. घरात सगळीकडे ईशाला शोधतात. पण ती कुठेच सापडत नाही. गच्चीवर जातात तेव्हा ईशा उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पहायला मिळते. आता पुढे काय घडणार, हे पाहण्यासाठी मालिकेच्या पुढील भाग पहावे लागेल.

अश्या पद्धतीने मालिकेचे शूटिंग शेड्युल, कथानकातील वळणे आणि प्रेक्षकांची पसंत नापसंत सांभाळून या मालिकांचा डोलारा उभा असतो. अश्यावेळी बटर स्कॉच सारख्या लहानग्या खेळकर पाहुण्यांचे येणे हे कलाकारांसाठी आल्हाददायी होते. मालिकेतील अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर हिने ‘आमची संवाद लेखिका मुग्धा गोडबोले चं हे बाळ आज सेटवर आलं आणि वातावरण प्रफुल्लित करून गेलं…!!!’ असं कॅप्शन देत त्याच्यासोबतच फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

तसेच मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेता मिलिंद गवळी यानेदेखील बटर स्कॉचसोबतचा एक सुंदर फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.