Take a fresh look at your lifestyle.

‘तू मी आणि पुरणपोळी’..! प्रेक्षकांच्या लाडक्या ओम स्वीटूची लव्हस्टोरी आता चित्रपट रुपात अवतरणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या झी मराठीवर सुरु असलेली मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला अत्यंत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. एक मुलगी जी हक्काचं माहेर सोडून एका अश्या घरात प्रवेश करते जे पुढे जाऊन तीच सासर होणार असत. या प्रवासात तिला पतीची प्रेमळ साथ असली तरी एका जिवाभावाच्या मैत्रिणीची तिला कायमच उणीव भासते. अशावेळी सासूच जर तिची मैत्रीण झाली तर..? अशा गोड नात्याची कहाणी या मालिकेत पाहायला मिळत आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका झी मराठीवर येऊन अगदी फार वेळ झालेला नाही. पण अल्पावधीतच ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. इतकेच नव्हे तर मालिकेतील ओम आणि स्वीटू प्रेक्षकांना फारच भावले आहेत. त्यांची लव्ह स्टोरी तर भन्नाट चालतेय. आता लवकरच हि लव्हस्टोरी चित्रपट रूपात अवतरणार आहे.

रसिकप्रेक्षक मालिकेला आणि त्यातील जवळ जवळ सर्व पात्रांना भरभरून प्रेम करीत आहेत. मग त्यात नलू, दादा, चिन्या, शकू, मालविका, रॉकी, मोहित आणि अगदी जादू याचाही समावेश आहे. ह्या पात्रांना प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलं आहे. पण या मालिकेतील स्वीटू म्हणजे ‘अन्विता फलटणकर’ आणि ओम म्हणजे ‘शाल्व किंजवडेकर’ ह्या फ्रेश जोडीने प्रेक्षकांवर वेगळीच छाप सोडली आहे.

 

प्रत्येक पावलावर स्वीटूला मदत करणारा आणि तिच्या सोबत सावली सारखा उभा राहणारा ओम या दोघांच्या घट्ट मैत्रीचे आता प्रेमात रूपांतर होताना दिसत आहे. आता ह्यापुढचा टप्पा “तू मी आणि पुरणपोळी” असा १६ मे २०२१ला संध्याकाळी ७ वाजता चित्रपट रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

आता ह्या ‘तू, मी आणि पुरणपोळी’ मध्ये नेमके काय असणार आहे, हे आत्ताच सांगितले तर पुरणपोळीचा गोडवा कमी होईल ना. मग त्यासाठी तुम्ही थोडी उत्सुकता ताणून ठेवा. फक्त येत्या रविवार १६ मे पर्यंत. मग काय रविवार आला कि संध्याकाळी बरोबर ७ वाजता आपल्या पूर्ण कुटुंबासोबत झी मराठीवर ह्या चित्रपटाची मजा लूटा. ओम स्वीटू ची लव्हस्टोरी “तू मी आणि पुरणपोळी” आता प्रेक्षकांसाठी काय गोडवा घेऊन येणार आणि मालिकेचे हे वळण प्रेक्षक आणि मालिकेतील उरले सुरले अंतर कसे मिटवणार हे पाहणे अत्यंत रंजक असणार आहे.