Take a fresh look at your lifestyle.

आकाशवाणीच्या दुनियेतील आवाजाचे जादूगार शिरले बिग बॉस मराठीच्या घरात; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व आता अगदीच शेवटच्या टप्प्यात आहे. बिग बॉस ३ ची ट्रॉफी कोण जिंकणार हे समजायला अवघे काहीच तास उरले आहेत. घरात नुकतेच शेवटचे एलीमिनेशन झाले आणि यामध्ये लेडी बिग बॉस अर्थात स्पर्धक मीरा जगन्नाथ घराबाहेर गेली. त्यामुळे उरले फक्त ५. आता बिग बॉसच्या घरात टॉप ५ उरले आहेत. यामध्ये विशाल निकम, विकास पाटील, मीनल शहा, जय दुधाणे आणि उत्कर्ष शिंदे हे पाच स्पर्धक आहेत. आता घरात उरलेले काहीच तास स्पर्धकांसह प्रेक्षकांनीही एन्जॉय करावे म्हणून बिग बॉसच्या घरात आले RJ पीपल्स. अर्थात आकाशवाणीच्या दुनियेतील तुमच्या आमच्या ओळखीचे आवाज.

या पर्वाचा शेवटही प्रेक्षकांसाठी खास आणि मनोरंजक असावा म्हणून निर्मात्यांनी शोमध्ये विविध सर्प्राइजेस देण्याचे योजिले असून आता एक एक सरप्राईज उघड होत आहे. यात पहिले मिड वीक एलिमिनेशन झाले. त्यानंतर मीरासाठी तिच्या आई वडिलांना AV दाखवला गेला.

बिग बॉसच्या घरात मीराला तीच दुरावलेलं कुटुंब परत मिळालं. यानंतर आता शेवटच्या दिवसात या शोमध्ये आणखी एक सरप्राइज पहायला मिळाले. बिग बॉसच्या घरात रेडिओ आरजे यांची एन्ट्री झाली आणि आवाजामागील खरे कल्लाकर प्रत्यक्षात समोर आले. त्यांनी स्पर्धकांसोबत मस्त कल्ला केला.

बिग बॉसच्या घरात आरजे शोनाली, आरजे स्मिता, आरजे बंड्या, आरजे श्रुती यांनी येऊन स्पर्धकांसोबत मज्जा केली. टीव्हीच्या माध्यमातून ते घरातील स्पर्धकांची संवाद साधत थोडी मजा, थोडी मस्ती आणि कल्ला करून गेलॆ. दरम्यान बिग बॉसने सगळ्यांना सांगितले की, घरात त्यांना खूप मोठे सरप्राइज मिळणार आहे. हे ऐकून सगळेच खूप खुश झाले आणि यावेळी एंट्री झाली RJ पीपल्स ची.

यानंतर सगळे आरजे घरातील स्पर्धकांना प्रश्न विचारतात तसेच अनेक खेळ खेळतात आणि शोच्या शेवटच्या क्षणी एकमेकांविरोधात प्रश्न विचारल्यामुळे सगळे चक्रावून काय वाट्टेल ते मजेशीर उत्तर देताना दिसले. या एपिसोडनंतर घरातील माहोल थोडे बदलले आहे पण अजूनही उत्सुकता तीच कि कोण होणार बिग बॉस ३ च्या ट्रॉफीचा मानकरी.