हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। असे अनेक कलाकार आहेत जे अत्यंत लोकप्रिय असूनही आपले आयुष्य सामान्यपणे जगणे पसंत करतात. मग कुटुंबासोबत वेळ घालवणे असो किंवा मग आठवड्याचा बाजार. नुकतीच एक प्रसिद्ध अभिनेत्री कर्जतच्या शुक्रवार बाजारात जाऊन खरेदी करताना दिसली. मुख्य म्हणजे तोंडाला स्कार्फ बांधल्यामुळे ती नक्की आहे तरी कोण..? हे समजणे मुश्किल झाले. पण तिने मात्र मनसोक्त खरेदी केली आणि तिच्या आवडीची गावठी मेथी विकत घेतली. तर ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून टीव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरा अभिनेत्री जुई गडकरी आहे.
जुई गडकरीने कर्जतच्या शुक्रवार बाजारातील एक व्हिडिओ शेयर केलाय. यामध्ये ती स्कुटीवरून बाजारात फेरफटका मारताना दिसतेय. यावेळी तिने गावठी मेथी आणि काही अन्य भाज्या खरेदी केल्या. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले, ‘जे लोक मला ओळखतात त्यांना माझ्या भाज्या खरेदीबद्दलच्या प्रेमाबद्दल माहिती आहे!! मी कुठेही जाऊन ताजी भाजी घेऊ शकते!! आणि सकाळी उठून शुक्रवारच्या बाजारात राइड करून घरी उगवलेल्या ताज्या भाज्या घ्यायच्या.. यापेक्षा चांगला पर्याय कोणता!! ही रील बघा आणि तुम्हाला #कर्जतचा उत्साह जाणवेल मला कर्जत खूप आवडतं’. जुई गडकरीची हि पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कर्जतच्या बाजारात गेलेल्या लोकांना स्कार्फ लावल्यामुळे जुईची ओळख न पटल्याचं नक्कीच दुःख होत असेल.
सध्या अभिनेत्री जुई गडकरी हि कर्जतला राहायला असून ती अनेकदा तिच्या शेड्युलमध्ये जसा वेळ मिळेल तशी कर्जतच्या बाजारपेठेत काही ना काही खरेदी करण्यासाठी जात असते. स्टार प्रवाह वाहिनीवर लोकप्रिय ठरलेल्या ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून कल्याणी हे पात्र साकारत तिने प्रेक्षकांच्या घराघरांत अन मनामनात जागा मिळवली.
यानंतर जुई बिग बॉस मराठी मध्येही झळकली होती.आणि आता बऱ्याच वर्षांनी ती पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकते आहे. तिच्या या भूमिकेवर प्रेक्षकही प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
Discussion about this post