Take a fresh look at your lifestyle.

मुहूर्त ठरला! आलिया- रणबीर ‘या’ दिवशी विवाहबंधनात अडकणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून बी टाऊनचे क्युट कपल आलिया आणि रणबीरच्या लग्नाची जोरोशोरोसे चर्चा सुरु आहे. यानंतर अखेर त्यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला आहे. या महिन्याच्या १७ तारखेला दोघेही एकमेकांसोबत साताजन्माची गाठ बांधण्यास सज्ज झाले आहेत.

आलियाच्या आजोबांची म्हणजेच एन. राजदान यांची तब्बेत नाजूक असल्यामुळे त्यांनी एप्रिल महिन्याचा विचार करत तारीख ठरवली आहे. आलिया आणि रणबीरच्या निकटवर्तीयांकडून ते दोघे १७ एप्रिल २०२२ रोजी लग्न करणार असल्याचे समोरचे आले आहे. तसेच येत्या काही दिवसात बॅचलर्स पार्टीचे देखील नियोजन करण्यात येत आहे अशी माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा विविह सोहळा गुपचूप पार पडेल. तसेच या लग्नात फक्त दोन्हीकडील कौटुंबीक सदस्यच हजेरी लावणार आहेत. हा विवाह समारंभ आरके स्टुडिओमध्ये होणार असून अद्याप अशी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या रणबीर- आलिया हे चेंबुरमधील आरके स्टुडिओच्या लॉजिस्टिक्सवर काम करत आहेत. अद्याप लग्नातील प्रमुख पाहुण्यांची माहिती मिळालेली नाही. मात्र लग्नासाठी मेहंदी विशेषज्ज्ञ वीणा नागदा यांच्याबरोबर संपर्क साधण्यात आल्याचे समजत आहे.

याशिवाय रणबीर आपल्या खास मित्र आणि मैत्रिणींसाठी लग्नाआधी बॅचलर पार्टी आयोजित करणार आहेत. दरम्यान रणबीरच्या बॅचलर पार्टीत सहभागी होणाऱ्या सेलेब्रिटींपैकी काही नावं समोर आली आहेत. यामध्ये रणबीरसह अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर आणि अयान मुखर्जी यांच्यासोबत पार्टीचे नियोजन करत आहे. रणबीरच्या या बॅचलर पार्टीत त्याच्या जवळचे मित्र आणि बालपणीचे दोस्त सहभागी होणार आहेत.