Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

टायगर श्रॉफच्या आवाजात घुमणार ‘वंदे मातरम’चे सूर; टिझर झाला प्रदर्शित

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 7, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Tiger Shroff
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफसोबत जॅकी भगनानीच्या जे जस्ट म्यूझिकने आज (७ ऑगस्ट २०२१) देशभक्ती गीत ‘वंदे मातरम’चे मोशन पोस्टर सर्वत्र प्रदर्शित केले आहे. मुख्य बाब अशी कि या गीताला अभिनेता टायगर श्रॉफ याने आवाज दिला आहे. इतकेच नव्हे तर, हे त्याचे पहिले वाहिले हिंदी गाणे आहे. या आधी त्याने २ इंग्रजी गाणी गेली आहेत आणि ती यशस्वीदेखील ठरली आहेत. तर टायगरचे हे गाणे येत्या १० ऑगस्ट २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर यासंदर्भातील पोस्ट केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

जॅकी भगनानीच्या जे जस्ट म्यूझिकने याआधी आलिया भट्टवर चित्रित केलेलं प्रादा, मुस्कुराएगा इंडिया आणि जुगनी 2.0 हि गाणी सर्व स्तरांवर प्रचंड गाजली. त्यानंतर आज प्रदर्शित करण्यात आलेले हे मोशन पोस्टर तात्काळ आपल्या मनात देशभक्तीची भावना निर्माण करणारे आहे. शिवाय १५ ऑगस्ट देखील अगदी तोंडावर असताना हे गाणे रिलीज होणार म्हणजे सर्वत्र वंदे मातरमचे सूर चांगलेच घुमणार. शिवाय हे गाणं रेमो डिसूजाद्वारे दिग्दर्शित करण्यात आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

अभिनेता जॅकी भगनानी आणि टायगर श्रॉफ या सुंदर ट्रॅकसाठी गायक आणि संगीत निर्माता म्हणून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. तर हा ट्रॅक सर्वात मोठा, बोल्ड सिंगल्सपैकी एक असेल जो लवकरच आपल्या भेटीस येत आहे. शिवाय जॅकी भगनानी, टायगर श्रॉफ आणि रेमो डिसूजा यांचं हे त्रिकुट कमालीचं सादरीकरण घेऊन प्रस्तुत करीत आहे त्यामुळे रसिकहो तयार रहा! टायगर श्रॉफने गायलेले ‘वंदे मातरम’ गाणे रेमो डिसूजाद्वारे दिग्दर्शित आहे तर विशाल मिश्राद्वारा रचित, कौशल किशोर द्वारा लिखित आणि अंकन सेन, जुईली वैद्य आणि राहुल शेट्टी यांच्याद्वारे कोरियोग्राफ केलेलं आहे. हे गाणं मनामनात देशभक्तीचा संचार करणारे आहे यात काही वादच नाही.

Tags: J Just MusicJacky BhagnaniPatriotic SongRemo D'souzaResoundtiger shroffVande Mataram
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group