Take a fresh look at your lifestyle.

‘हे आपलं काळीज हाय’; प्रेमाची परिभाषा बदलणाऱ्या ‘143’च्या पोस्टरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर एका टॅगलाईनने तरुणाईला चांगलेच वेधले आहे. ‘हे आपलं काळीज हाय‘ असा हॅशटॅगसुद्धा सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलाय. हि लक्षवेधक टॅगलाईन आणि हटके हॅशटॅग प्रेमाची परिभाषा बदलणाऱ्या आगामी ‘143’ या चित्रपटाचा असून यात कोण कोणाचं काळीज आहे याच आता उलघडा होतोय. नुकतेच पोस्टर रिलीज झालेला ‘143’ हा चित्रपट प्रेममय भावना व्यक्त करणारा आणि तरुणाईचे लक्ष वेधून घेणारा आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण दाक्षिणात्य पद्धतीने केले असले तरी हा एक मराठी चित्रपट आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची विशेष उत्सुकता आहे.

या प्रेममय कथानकाच्या ‘143’चे पोस्टर दिग्दर्शक योगेश भोसले यांच्याकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आले आहे. तर संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी चित्रपटासाठी संगीतबध्दता केली आहे. शिवाय दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नामांकित नृत्य दिग्दर्शक आर. कलाई केरला यांनी या चित्रपटाची नृत्य दिग्दर्शकाची सूत्रे जबाबदारीने पार पडली आहेत. तसेच छायाचित्रकार विकास सिंग यांनी चित्रपटासाठी उत्तम चित्रीकरण केले आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेलं चित्रपटाचं पोस्टर त्याच्या प्रेमबद्ध कथेला बांधून ठेवणारं आहेच आणि त्याचसोबत लक्षवेधकही आहे.

दिग्दर्शक योगेश भोसले यांनी दाक्षिणात्य पद्धतीने चित्रित केलेल्या या चित्रपटात कोणते कलाकार असतील हे अद्याप अस्पष्ट आहे. परंतु पोस्टरनंतर प्रेक्षकांच्या चित्रपटाविषयी विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या काळात चित्रपटगृहांना टाळे लागल्यामुळे रसिक प्रेक्षकांच्या नजरा मनोरंजनाकरिता ओटीटीकडे वळल्या. परंतु आता प्रेमाचा डोस घेऊन चित्रपटगृह सुरू होताच ‘143..हे आपलं काळीज हाय’ ​हा नवाकोरा प्रत्येकाच्या काळजाला हात घालणारा प्रेमाची परिभाषा बदलणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे.