Take a fresh look at your lifestyle.

भारतीय प्रेक्षकांनाही भुरळ घालणाऱ्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा प्रीक्वल ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’चा टीजर प्रदर्शित; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘गेम ऑफ थ्रोन्स’ हा संपूर्ण जगातील अत्याधिक लोकप्रिय आणि हिट शोपैकी एक शी आहे. गेल्या कितीतरी वर्षांपासून या शोने संपूर्ण जगभरतील प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. चक्क भारतामधूनही या शोला चाहत्यांकडून अत्यंत प्रेम मिळाले. यामुळे ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या चाहत्यांसाठी आता एक सगळ्यात मोठी आणि तितकीच आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा प्रीक्वल येऊ घातला आहे. प्रीक्वलचे नाव ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’ असे ठेवण्यात आले असून सध्या सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. याशिवाय नुकताच ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’चा टीजरही प्रदर्शित झाला आहे.

गेम ऑफ थ्रोन्सचा ८वा सीझन संपला आणि चाहते नव्या सिझन वा प्रीक्वलची जोरदार मागणी करताना दिसले. त्यामुळे आता निर्मात्यांनी चाहत्यांनी मागणी मनावर घेतली आणि चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. माहितीनुसार, हाऊस ऑफ द ड्रॅगन २०२२ मध्ये रिलीज होणार आहे. परंतु आता बराच काळ वाट पाहिल्यानंतर निर्मात्यांनी रिलीजबाबत अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. या प्रीक्वलचा हा टीझर खूपच रंजक आहे. आर. आर. मार्टिन यांची कादंबरी फायर अँड ब्लडवर हि कथा आधारीत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखीच ताणली आहे.

आर. आर. मार्टिन यांची कादंबरी फायर अँड ब्लड ही २०१८मध्ये लिहिली होती. या सिरीजमध्ये गेम ऑफ थ्रोन्सच्यापूर्वी २०० वर्षांपूर्वी काय घडले हि कथा दाखवली जाणार आहे. यात गेम ऑफ थ्रोन्सच्या सीझनसारखे एकूण १० एपिसोड असतील. गेम ऑफ थ्रोन्स शो हा त्याच्या भव्यदिव्य देखाव्यांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरला होता. अगदी तशीच भव्यता हाऊस ऑफ द ड्रॅगनमध्ये दिसून येईल अशी निर्मात्यांनी खात्री दिली आहे. यामध्ये Emma D’Arcy, Matt Smith, Steve Toussaint, Olivia Cooke, Rhys Ifans हे दिग्गज हॉलिवूड कलाकार दिसणार आहे.