Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

यासाठी केला होता उलट्या पोस्टचा अट्टाहास; झी मराठीवर येतोय भीतीने थरकाप उडवणारा ‘चंद्रविलास’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 27, 2023
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Chandravilas
0
SHARES
909
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कालच्या दिवसभरात लोकप्रिय मराठी वाहिनी झी मराठीच्या सोशल मीडिया अकाउंट्सने काही वेगळंच रूप धारण केलं होत. रोज विविध प्रोमो, फोटो, व्हिडीओ शेअर करून लक्ष वेधणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट अचानक उलट्या झाल्या आणि सगळं अजब गजब झालं. हे नक्की काय चाललंय याबाबत कुणालाच काहीच माहित नव्हतं. काहींनी झी मराठीचं सोशल मीडिया अकाउंट हॅक झालं असे तर्क लावले आणि हीच बातमी खरी असल्यासारखी पसरली. पण अखेर हा काय प्रकार होता याची उकल झाली आहे. हे उत्तर इतकं धडकी भरवणार आहे कि बास्स्स..

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

झी मराठी वाहिनीच्या उलट्या पोस्टमागे दडली होती प्रमोशनची कल्पना. लवकरच झी मराठी वाहिनीवर हॉरर जॉनरची नवी मालिका सुरू होत आहे. या मालिकेचे नाव ‘चंद्रविलास’ असे आहे. ही गोष्ट आहे ‘चंद्रविलास’ या दोनशे वर्षांपूर्वीच्या वास्तूची आणि त्यात अडकलेल्या बाप-लेकीची असून अत्यंत लक्षवेधी आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो रविवारी संध्याकाळी रिलीज करण्यात आला. पहिल्या प्रोमोनेच पायाखालच्या जमिनीचं भय मनात वसवलं आहे. या मालिकेतील मुख्य भूमिका अभिनेता वैभव मांगलेच्या पदरी पडली आहे. त्यामुळे हि भूमिका १०० टक्के गाजणार यात काहीच वाद नाही.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

व्हायरल प्रोमोमध्ये एक बाप आपल्या लेकीचा १६ वा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना येणार तो अन्य आवाज त्यांचे लक्ष वेधून घेतो आणि कुणीतरी आहे याची जाणीव करून देतो. हि मालिका अनाकलनीय घटनांची सूत्रबद्धता आहे. ‘गूढ अंधारमय जगाची उलटी वाट, थरकाप उडवणार भीतीची लाट..’ असे टायटल लाईन असणारी ‘चंद्रविलास’ हि मालिका काहीतरी नवीन आणि वेगळेपण घेऊन येत आहे याचा प्रेक्षकांना आनंद आहे. या प्रोमोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून मालिकेबाबतची उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे. हि मालिका येत्या २७ मार्च २०२३ रोजी सुरु होणार असून रात्री ११ वाजता प्रसारित होणार आहे.

Tags: ChandravilasInstagram PostOfficial PromoTV ShowViral Videozee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group