Take a fresh look at your lifestyle.

सलमान खानच्या राधे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पडणार लांबणीवर; प्रेक्षक झाले नाराज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सलमान खानच्या आगामी चित्रपटाची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरात त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. अश्यावेळी त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता होती. त्याचा ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट १३ मे २०२१ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मल्टीप्लेक्स बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

सलमान खानने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, राधे ईदला प्रदर्शित करण्याचा आमचा विचार होता. पण कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने महाराष्ट्रात मल्टीप्लेक्स बंद आहेत. ही स्थिती अशीच राहिली तर हा चित्रपट पुढच्या ईदला प्रदर्शित होईल. पण लोकांनी मास्क घातले, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले, तर कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण कमी होईल आणि हा चित्रपट या ईदलाच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सलमानने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे जाहीर केली होती. ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर करीत त्यासोबत लिहिले होते की, ईदचे कमिटमेंट होते आणि ईदलाच येणार.. हा चित्रपट बरोबर दोन महिन्यांनी म्हणजेच १३ मे ला प्रदर्शित होणार आहे. ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करत आहेत. तर सलमान खान यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत दिशा पटनी, रणदीप हुड्डा हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.