Take a fresh look at your lifestyle.

बिग बॉस मराठीच्या घरात राक्षसांचा हाहाकार; नवा टास्क रंगणार का स्पर्धक राडा घालणार?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वरील अत्यंत लोकप्रिय आणि वादग्रस्त असा शो म्हणजे बिग बॉस मराठी3. घरातील प्रत्येक स्पर्धक आता जिंकायचंच या भावनेने खेळात असल्यामुळे हा शो पाहण्यात प्रेक्षकांनाही एक अनोखा आनंद मिळत आहे. पण झालाय असं कि, यावेळच्या सिजनमध्ये सतत भांडणं, बाचाबाची आणि टास्क दरम्यान नुसतेच राडे पहायला मिळत आहेत . यामुळे कितीतरी टास्क वाया आणि रद्द झाल्याचे पाहायला मिळले. दरम्यान घरात दोन गट पडलेले असल्यामुळे सारखीच भांडण होतात. यानंतर आता ‘बिग बॉसने स्पर्धकांना संयमाची ऐशी तैशी हे साप्ताहिक कार्य दिले आहे. या कार्यात कोणाचा संयम तुटणार? कोण संयम बाळगणार? हा टास्क रंगणार? का पुन्हा एकदा रद्द होणार? हे पाहणे रंजक असणार आहे. या टास्क दरम्यान गायत्रीने तृप्ती तर स्नेहाने सोनाली यांच्या नाकी नऊ आणले आहेत. पण शेवटी संयमच जिंकणार आहे.

टास्कदरम्यान गायत्री म्हणाली, “तृप्तीताईंना तर काहीच नाही येत करता… नुसतं सगळं कॅमेरासाठी करायचं. सगळं पक्षपाती करायचे. तृप्तीताई म्हणाल्या “मला बांधू द्या… तुम्ही म्हणाल तसं”. तर गायत्री म्हणाली, आम्ही राक्षस नाही तुम्ही राक्षस आहात खरंतर तर. एक साधा महामेरू बांधता येत नाही, या कसल्या देवदूत? बांधता पण येत नाही नीट हो ना? विकास आणि गायत्री बोलताना दिसणार आहे फक्त खोट बोलतात तृप्तीताई. त्या नाही या टीमकडून नाही त्या टीमकडून बरोबर ना? आता या बोलण्यावर तृप्ती संयम दाखवतात का वाट लावतात हे पाहायचं असेल तर हा टास्क पाहणं खूप गरजेच आहे.

तर याच टास्कमध्ये स्नेहा सोनालीला सगळ्यांसमोर लोटांगण घालून घरातील केर काढायला लावणार आहे. त्यामुळे आता या कार्यात नक्कीच वाद होणार अशी शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान स्नेहा नरकामध्ये आहे. तर, सोनाली स्वर्गात आहे. त्यामुळे स्नेहा सोनालीला लोटांगण घालून घरातील केर काढायला लावणार आहे. इतकंच नाही तर यावेळी दादूस आणि विशाल, सोनालीसोबत बोलत असताना स्नेहा त्यांना मध्येच आडवते. आणि, ओ तुम्ही असं मध्ये बोलायचं नाही, असं ठणकावून सांगते. इतकेच नव्हे तर या टास्क दरम्यान नेहमीप्रमाणे जय आणि मीनल पुन्हा एकदा भिडताना दिसणार आहेत. बापरे बाप.. या टास्कमध्ये प्रत्येकजण आपल्याला दिलेली भूमिका चांगलाच निभावतंय. कुणाचा देवदूत तर कुणाला खरोखरच राक्षस झाला आहे असेच वाटत आहे.